शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, खटला दाखल; मस्क यांचंही टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:42 IST

Donald Trump News: अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे.

अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर, काही मिनिटांतच खटल्याचा सामना करावा लागत आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे. DOGE चे नेतृत्व एलन मस्क करत आहेत. ज्याचा उद्देश्य सरकारी खर्च कमी करणे आहे. 

ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित DOGE योजनेचे लक्ष्य सरकारी खर्च 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी करणे आहे. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याच्या भीती निर्माण झाली आहे. AFGE चे म्हणणे आहे की, DOGE योजना संघीय नियमांचे पालन करत नाही. तसेच, आवश्यक नियमांचे पालन करेपर्यंत DOGE ला सल्लागार समिती म्हणून काम करण्यापासून रोखण्यात यावे, अशी अपीलही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.

एलन मस्क यांची भूमिका -डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफीशिएन्सीची जबाबदारी एलन मस्क यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, मस्क यांच्या भूमिकेबद्दल चिंता आहे की, त्यांची योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि हितांवर प्रतिकूल परिणाम करू शकते. AFGE ने यावर आक्षेप घेत, या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कपातीमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे.

ट्रम्प यांचा शपथविधी आणि घोषणा -शपथविधीनंतरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला 'लिबरेशन डे' अथवा 'मुक्ती दिन' म्हणत, अमेरिकेचा 'सुवर्णयुगा'ला प्रारंभ झाला असल्याचे म्हटेल आहे. 'अमेरिका फर्स्ट' या अजेंड्यावर भर देत ट्रम्प म्हणाले, आपण देशाला सुरक्षित, परवडणारे आणि ऊर्जा क्षेत्रात अग्रणी बनवण्यासाठी धाडसी पावले उचलणार आहोत. याशिवाय, बायडेन प्रशासनाची धोरणे बदलण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठीही त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांचीही घोषणा केली.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पelon muskएलन रीव्ह मस्कCourtन्यायालयAmericaअमेरिका