ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ १० ऐवजी १५ टक्के; बदललेले आयात शुल्क १५० दिवसांसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 06:03 IST2026-02-22T06:02:37+5:302026-02-22T06:03:30+5:30

Donald Trump New tariffs: जर हा कर १५० दिवसांनंतरही सुरू ठेवायचा असेल, तर ट्रम्प यांना अमेरिकेच्या संसदेची (काँग्रेस) अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल.

Trump's new blow; New tariff is 15 percent instead of 10; Changed import duty for 150 days | ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ १० ऐवजी १५ टक्के; बदललेले आयात शुल्क १५० दिवसांसाठी

ट्रम्प यांचा एक नवा धक्का; नवे टॅरिफ १० ऐवजी १५ टक्के; बदललेले आयात शुल्क १५० दिवसांसाठी

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनमानी आयात शुल्कावर (टॅरिफ) बंदी घातल्यानंतर अवघ्या २४ तासांत ट्रम्प यांनी जोरदार पलटवार केला आहे. शुक्रवारी रात्री १० टक्क्यांच्या नव्या कराची घोषणा करणाऱ्या ट्रम्प यांनी शनिवारी या कराचा दर वाढवून थेट १५ टक्के केला आहे. 

हे नवे १५ टक्के शुल्क केवळ १५० दिवसांसाठी लागू असेल आणि त्याची अंमलबजावणी २४ फेब्रुवारीपासून होईल. जर हा कर १५० दिवसांनंतरही सुरू ठेवायचा असेल, तर ट्रम्प यांना अमेरिकेच्या संसदेची (काँग्रेस) अधिकृत मंजुरी घ्यावी लागेल. नव्या करदराची घोषणा करताना ट्रम्प यांनी न्यायालयाच्या निर्णयाला "अमेरिका विरोधी" संबोधले आहे. २४ फेब्रुवारीपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या मालावरही अतिरिक्त बोजा पडणार आहे.

निकाल 'हास्यास्पद'

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी ट्रम्प यांचे आणीबाणीचे अधिकार वापरून कर लावण्याचे अधिकार नाकारले होते. यावर संताप व्यक्त करत ट्रम्प यांनी टूथ सोशल या वेबसाइटवर एक पोस्ट केली आहे. यामध्ये त्यांनी, न्यायालयाचा कालचा निर्णय हास्यास्पद, सुमार दर्जाचा आणि पूर्णपणे अमेरिकेच्या विरोधी आहे. सखोल अभ्यासानंतर मी आता हा कर १५ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे, असे म्हटले आहे.

कायदेशीर पळवाट

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाच्या दणक्यानंतर ट्रम्प यांनी १९७४ च्या व्यापार कायद्यातील 'कलम १२२' चा आधार घेतला आहे. हा कायदा राष्ट्राध्यक्षांना संसदेची परवानगी न घेता तात्पुरते कर लावण्याचे अधिकार देतो. मात्र, याला काही मर्यादा आहेत.

'आम्ही विश्लेषण करत आहोत'

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी १ शुल्काबाबत दिलेला निकाल आमच्या निदर्शनास आला आहे. या संदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचीही आम्ही नोंद घेतली आहे. २ अमेरिकन प्रशासनाने काही नवीन पावले उचलण्याची घोषणा केली असून, या सर्व घडामोडींचा भारतीय व्यापारावर काय परिणाम होईल, याचे विश्लेषण सध्या सरकार करत आहे. भारतीय निर्यातदारांचे हिताचे रक्षण करण्याला सरकारचे प्राधान्य राहील -वाणिज्य मंत्रालय, भारत सरकार

पुन्हा एकदा अमेरिकेसमोर समर्पण

पंतप्रधानांनी तडजोड केली आहे. त्यांचा विश्वासघात आता उघड झाला आहे. ते व्यापार करारावर पुन्हा वाटाघाटी करू शकत नाहीत. ते पुन्हा एकदा अमेरिकेसमोर समर्पण करतील. -राहुल गांधी, लोकसभा विरोधी पक्षनेते

Web Title : ट्रंप का नया शुल्क झटका: ड्यूटी बढ़ाकर 15 प्रतिशत की

Web Summary : अदालत के फैसले के बाद ट्रंप का पलटवार, 150 दिनों के लिए शुल्क 15% किया। भारत व्यापार पर प्रभाव का विश्लेषण कर रहा है। राहुल गांधी ने पीएम की आलोचना की।

Web Title : Trump's New Tariff Shock: Hikes Duty to 15 Percent

Web Summary : Trump retaliates after court ruling, raising tariffs to 15% for 150 days. India analyzes the impact on trade. Rahul Gandhi criticizes the PM.