शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

जगातील शक्तिशाली महिला ठरली 'पुरुष'! स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं, पण तिथेच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 08:56 IST

या प्रकरणावरून आता नवीन वाद आणि नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा वाद एका खेळापुरता आणि एका खेळाडूपुरता मर्यादित नाही. ज्यात शक्ती, ताकद, स्टॅमिना.. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

अर्लिंग्टन - अमेरिकेच्या टेक्सास प्रांतातील हे शहर. गेल्या आठवड्यात येथे जगातील एक अतिशय प्रतिष्ठेची स्पर्धा सुरू होती. 'वर्ल्डस स्ट्रॉगेस्ट वुमन कॉम्पिटिशन'! जगातील सर्वात शक्तिशाली महिला कोण हे या स्पर्धेत ठरणार होतं. विजेतेपदासाठी अनेक दावेदार होते पण अमेरिकेच्या जेमी बुकरनं या स्पर्धेत भल्याभल्यांना पाणी पाजलं आणि जगातील सर्वात शक्तिशाली महिलेचा किताब जिंकला !

...पण इथेच वादाची ठिणगी पेटली. आयोजकांनी दोन दिवसांतच तिचा हा किताब परत घेतला आणि उपविजेत्या ब्रिटनच्या अँड्रिया थॉम्पसनला विजेती घोषित करण्यात आलं. पण का? जेमीचा किताब का काढून घेण्यात आला? कारण आयोजकांच्या म्हणण्यानुसार, जेमी जन्मानं पुरुष होती आणि ही माहिती तिनं दडवून ठेवली होती. स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तिनं आयोजकांना ही माहिती दिली नव्हती. 

या प्रकरणावरून आता नवीन वाद आणि नवे प्रश्न निर्माण झाले आहेत. हा वाद एका खेळापुरता आणि एका खेळाडूपुरता मर्यादित नाही. ज्यात शक्ती, ताकद, स्टॅमिना.. या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. त्या महिला क्रीडा स्पर्धामध्ये गेली अनेक वर्षे हा प्रश्न उपस्थित केला जातोय. अगदी ऑलिम्पिक स्पर्धाही या वादातून सुटलेल्या नाहीत. जन्मानं पुरुष असलेले आणि नंतर महिला झालेले, ट्रान्सजेंडर खेळाडू महिला वर्गात खेळू शकतात का, हा कायम वादाचा विषय राहिला आहे. हा विषय अतिशय संवेदनशील आहे. एका बाजूला ओळख आणि सन्मानाचा मुद्दा आहे, तर दुसऱ्या बाजूला निष्पक्षता आणि महिला क्रीडा स्पर्धाच्या अस्तित्वाचा. यामुळे आगामी काळात क्रीडा संस्थांना आता अधिक ठोस आणि स्पष्ट नियम बनवावे लागतील. भविष्यात महिलांच्या क्रीडा स्पर्धांचे नियमही बदलले जातील. अर्थात त्याची तयारीही कधीपासूनच सुरू झाली आहे. त्यामुळे काही क्रीडा स्पर्धामध्ये जन्माने पुरुष असलेल्या आणि नंतर ट्रान्सजेंडर झालेल्या खेळाडूंना महिला गटात खेळण्यास परवानगी नाही.

स्पर्धा समितीनं अधिकृत निवेदनात म्हटलं आहे, आम्हाला नंतर कळलं की, महिला वर्गात भाग घेणारी एक खेळाडू जन्मानं पुरुष होती. जर ही माहिती आधी दिली असती, तर तिला महिला वर्गात खेळण्याची अनुमती मिळाली नसती. आमचे नियम स्पष्ट आहेत- खेळाडूनं आपल्या जन्माच्या आधारावर ठरलेल्या वर्गातच खेळायला हवं. याच कारणानं आम्ही आता जेमीला स्पर्धेतून अपात्र ठरवलं आहे.. आयोजकांना जेमीचे काही जुने व्हिडीओही मिळाले, ज्यात जेमीनं स्वतःला 'ट्रान्स वुमन' म्हटलं होतं. या प्रकरणानंतर जेमीच्या प्रमुख स्पॉन्सरनंही तिच्याबरोबरचा करार तातडीनं रद्द केला आहे. त्यांचं म्हणणं आहे, आम्ही ओळखीच्या आधारावर भेदभाव करत नाही; पण स्पर्धेशी संबंधित महत्त्वाची माहिती लपवणं हा नियमांचा भंग आहे. याच कारणानं आम्ही जेमीशी असलेला करार तत्काळ रद्द करत आहोत..

अनेक माजी विजेत्या, खेळाडू आणि प्रशिक्षकांनी अॅड्रिया थॉम्पसनलाच 'खरी विजेती' म्हटलं आहे. तीन वेळा चॅम्पियन राहिलेल्या रेबेका रॉबर्ट्स म्हणतात, हा कुणाच्या ओळखीचा प्रश्न नाही; पण महिलावर्ग सुरक्षित आणि निष्पक्ष राहणं खूप गरजेचं आहे. ताकदप्रधान खेळांमध्ये जन्मआधारित फरक खूप महत्त्वाचे ठरतात. त्यांची ही प्रतिक्रियाही जगभर चर्चेचा विषय ठरते आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Transgender Strongwoman Stripped of Title: Controversy Erupts Over Eligibility

Web Summary : Jamie, initially declared world's strongest woman, lost her title. Organizers discovered she was assigned male at birth, violating competition rules. This sparked debate about transgender athletes in women's sports, raising fairness and identity questions.
टॅग्स :World Trendingजगातील घडामोडी