शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
2
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
3
"तू मला आवडतेस, माझ्याकडे दैवी शक्ती..."; नाशिकच्या आणखी एका भोंदूबाबाचा कारनामा उघड
4
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; सेन्सेक्स ४०० अंकांनी खाली, Pharma-IT शेअर्समध्ये मोठी विक्री
5
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
6
IPL: इश्क वाला लव्ह! अनंत अंबानी - राधिका मर्चंट यांचा MI vs CSK मॅचमधील Cute Video चर्चेत
7
ना खेळपट्टी, ना कुठली सबब, हार्दिक पांड्याने 'या' खेळाडूंवर फोडलं मुंबईच्या पराभवाचं खापर
8
सीता नवमी २०२६: आयुष्यातील संकटांनी खचून गेलात? मग माता सीतेचा 'हा' एक गुण तुम्हाला उभारी देईल!
9
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
10
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
11
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
12
Pune Water Shortage: पुण्याच्या पेठांमध्ये सकाळपासून पाणी नाही; पाण्यासाठी दुपारपर्यंत पाहावी लागणार वाट
13
लव्ह अफेअरचा दुर्दैवी अंत! २ तास गर्लफ्रेंडच्या ३ भावांनी मिळून बेदम मारले; बॉयफ्रेंडचा मृत्यू
14
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
15
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
16
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
17
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
18
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
19
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
20
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जॉन मॅकफॉलच्या ‘अंतराळ झेपे’ची कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 09:05 IST

मोटारसायकलचा अपघात झाला. त्या अपघातात त्याने उजवा पाय गमावला. अपंग झाला.

एकोणीस वर्षांचा होता तेव्हा त्याच्या मोटारसायकलचा अपघात झाला. त्या अपघातात त्याने उजवा पाय गमावला. अपंग झाला. एवढा तरुण मुलगा असा अपंग झाला म्हटल्यावर त्याच्या चिंतेने सगळेच हळहळले.  

ही गोष्ट आहे जॉन मॅकफॉलची. ४३ वर्षांचा जॉन ब्रिटिश नागरिक आहे. तो एक पॅरालिम्पिक धावपटू आहे आणि सर्जनसुद्धा ! पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे युरोपियन स्पेस एजन्सीकडून इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील एका अंतराळ मोहिमेसाठी पाठवण्यात येणार असलेला पहिला अपंग अंतराळवीर म्हणून त्याची निवड करण्यात आली आहे. त्यासाठी आवश्यक त्या सगळ्या वैद्यकीय चाचण्या तो पास झाला आहे. युरोपियन स्पेस एजन्सीचे ह्यूमन ॲण्ड रोबोटिक एक्सप्लोरेशन डायरेक्टर डॅनियल न्यूएनश्वांडर यांनी याबाबत माहिती दिली.  २०२२ मध्ये युरोपियन स्पेस एजन्सीने  ‘फ्लाय’ या कार्यक्रमातून  एखाद्या अपंग अंतराळवीराचं अंतराळात राहणं कितपत शक्य आहे, याचा अभ्यास केला. मॅकफॉलला त्याच्या अपंग असण्यामुळे अंतराळात वावरण्यास कोणतेही अडथळे येणार नाहीत, हे स्पष्ट झाल्यानंतर एजन्सीकडून त्याच्या निवडीची घोषणा करण्यात आली.

ही संधी मिळवणं मॅकफॉलसाठी सोपं नव्हतं. सूक्ष्म गुरूत्वीय परिस्थितीत तग धरून राहण्यापासून ते इंटरनॅशनल स्पेस सेंटरमधील दैनंदिन काम कसं करणार आणि एखादी आणीबाणीची परिस्थिती उद्भवल्यास काय करणार, या सगळ्याची अवघड प्रात्यक्षिकं यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतरच त्याला ही संधी मिळाली. मॅकफॉलने ज्या सहजपणे अनेक गोष्टी आत्मसात केल्या ते पाहणं आपल्यासाठी ‘सरप्रायजिंग’ असल्याचं डॅनियल न्यूएनश्वांडर यांनी म्हटलं आहे.

असं असलं तरी अंतराळ मोहिमेवर जाण्यासाठी मॅकफॉलला आणखी काही अग्निपरीक्षा द्याव्या लागतील. इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये काम करत असताना किंवा तिथे जाण्यासाठी सुरक्षेबाबतचे नियम अत्यंत कठोर असतात, याकडे न्यूएनश्वांडर लक्ष वेधतात.  मॅकफॉलला त्याच्या कृत्रिम पायासह अंतराळ मोहिमेवर जाण्यास स्वतःला पात्र ठरवण्यासाठी  अनेक कठीण परीक्षा द्याव्या लागणार आहेत. अंतराळ मोहिमेवर जाताना अंतराळवीर स्वतःसोबत बरोबर नेतात ती प्रत्येक गोष्ट अत्यंत कठोर सुरक्षा तपासण्यांमधून जाते. त्यासाठी इंटरनॅशनल स्पेस सेंटरचे ‘सेफ्टी अँड ऑपरेशनल स्टँडर्डस्’ आहेत. ते सगळेच्या सगळे स्टँडर्डस् मॅकफॉलच्या कृत्रिम पायालाही लावले जाणार आहेत. मॅकफॉलसाठी अंतराळात वापरण्यायोग्य विशेष प्रकारचा पाय तयार करण्यासाठी एजन्सी ‘ऑटोबॉक’ नावाच्या जर्मन कंपनीबरोबर प्रयत्नशील आहे. आपल्याला मिळालेली संधी ही आपली एकट्याची नसून जगभरात कृत्रिम अवयव वापरणाऱ्या प्रत्येकाची आहे. आपण अंतराळात काय करणार त्याचा लाभ पृथ्वीवरील प्रत्येकाला व्हायला हवा, असंही मॅकफॉल म्हणतो. युरोपियन स्पेस एजन्सीने अंतराळ मोहिमेसाठी मॅकफॉलची निवड करणं हे अनेक अर्थांनी महत्त्वाचं आहे. दुर्मिळ संधी ही फक्त रुढार्थाने निरोगी व्यक्तींची मक्तेदारी नाही, हा संदेश त्यातून मिळतो. लवकरच आपल्या सगळ्यांना एक अपंग अंतराळवीर अंतराळात दिसणार, हे निश्चित.