थायलंड हादरलं! डे-केअर सेंटरमध्ये अंदाधुंद गोळीबार, २२ चिमुकल्यांसह ३४ जणांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:31 IST2026-02-11T17:31:01+5:302026-02-11T17:31:53+5:30
थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

फोटो - आजतक
थायलंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. २२ लहान मुलांसह एकूण ३४ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेने संपूर्ण देश हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये घुसून ३४ जणांचा बळी घेतला. याशिवाय दक्षिण थायलंडमधील 'हाट याई' येथील एका शाळेत १८ वर्षांच्या तरुणाने गोळीबार केला, ज्यामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले असून त्याने एका महिला कर्मचाऱ्याला ओलीस ठेवलं आहे.
थायलंडच्या इतिहासातील ही सर्वात भयानक घटना मानली जात आहे. एका माजी पोलीस अधिकाऱ्याने डे-केअर सेंटरमध्ये शिरून अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात किमान २२ मुलं आणि १२ लोकांचा मृत्यू झाला.
स्थानिक प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, ही देशाच्या इतिहासातील सर्वात घातक 'मास शूटिंग' घटना आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हल्ल्यामागचा नेमका उद्देश शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.