बदकशान प्रांतावर तालिबानचा हल्ला

By Admin | Updated: June 7, 2015 01:28 IST2015-06-07T01:28:23+5:302015-06-07T01:28:23+5:30

जवळपास ३०० पेक्षा जास्त तालिबानी बंडखोरांनी शनिवारी पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तरपूर्वेकडील बदकशान प्रांतावर हल्ला केला.

Taliban attack on Badakhshan province | बदकशान प्रांतावर तालिबानचा हल्ला

बदकशान प्रांतावर तालिबानचा हल्ला

काबूल : जवळपास ३०० पेक्षा जास्त तालिबानी बंडखोरांनी शनिवारी पहाटे अफगाणिस्तानच्या उत्तरपूर्वेकडील बदकशान प्रांतावर हल्ला केला. या हल्ल्यामुळे पोलीस अधिकारी संकटात सापडले असून आपल्या मदतीला जवान पाठविले जातील अशी त्यांना आशा आहे.
तालिबान्यांनी डोंगराळ व पहाडी अशा यामगन जिल्ह्यात हा हल्ला केला, असे बदकशान प्रांताचे उप पोलीसप्रमुख सखी दाद हैदरी यांनी सांगितले. पोलिसांच्या मदतीला कुमक लवकर आली नाही, तर जिल्हा हल्लेखोरांच्या तावडीत जाईल, असा इशारा हैदरी यांनी दिला. हल्ला झाला त्या भागात जायला रस्ता नाही. (वृत्तसंस्था)


तालिबान जिल्ह्याच्या मुख्यालयाजवळ असून जोरदार संघर्ष सुरू आहे, असे बदकशानच्या पोलीस प्रमुखांचे प्रवक्ते लाल मोहंमद अहमदझाई यांनी सांगितले. तालिबान्यांनी जिल्ह्याचे मुख्यालय ताब्यात घेतल्याचा दावा अहमदझाई यांनी फेटाळून लावला.

Web Title: Taliban attack on Badakhshan province