शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

असाद-पुतीन यांची अचानक भेट

By admin | Updated: October 22, 2015 03:57 IST

बंडखोरांशी गेली चार वर्षे लढणारे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी अचानक रशियाला भेट देऊन संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. मॉस्कोमध्ये जाऊन क्रेमलिनमध्ये

मॉस्को : बंडखोरांशी गेली चार वर्षे लढणारे सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल असाद यांनी अचानक रशियाला भेट देऊन संपूर्ण जगाला धक्का दिला आहे. मॉस्कोमध्ये जाऊन क्रेमलिनमध्ये रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी त्यांनी चर्चाही केली. असाद यांनी २०११ नंतर केलेला हा पहिलाच परदेश दौरा आहे.रशियाची राजधानी मॉस्को येथे झालेल्या चर्चेमध्ये असाद आणि पुतीन यांच्यासह रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्जे लॅव्रोव, संरक्षणमंत्री सर्जे शोयगू यांनीसुद्धा सहभाग घेतला. ३० सप्टेंबर पासून लढण्यासाठी मदत करत असणाऱ्या रशियाला आणि रशियन नेत्यांना आपण धन्यवाद देत आहोत असे वक्तव्य असाद यांनी यावेळेस केले. सीरियामध्ये पसरत चाललेल्या दहशतवादाला यामुळे रोखण्यास मदत झाली असे मत त्यांनी व्यक्त केले. सीरियामधील प्रश्नामध्ये सर्व वांशिक, राजकीय आणि धार्मिक गटांच्या समावेशानेच तोडगा काढता येईल असे मत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी यावेळेस व्यक्त केले. (वृत्तसंस्था)रशिया-सीरिया जवळीक रशियामध्ये उत्पादन झालेल्या शस्त्रास्त्रांसाठी सीरिया हा जुना ग्राहक आहे. रशियाने स्वत: सीरिया प्रश्नात लक्ष घालून आयसील दहशतवादी संघटनेच्या विरोधात लढण्याचे कारण पुढे करत सीरियन बंडखोरांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. अल्वाईट पंथाच्या असाद यांना लेबनॉनमधील हेझबोल्ला, रशिया आणि इराण यांचा उघड पाठिंबा मिळाला आहे. सीरियन युद्धसीरियात चाललेल्या यादवीमुळे २०११ पासून अडीच लाख लोकांनी प्राण गमावले आहेत. सुमारे एक कोटीपेक्षा अधिक लोकांना आपले घर सोडून परागंदा व्हावे लागले आहे. चाळीस लाखांहून अधिक लोकांनी देश सोडल्याची आकडेवारी उघड झाली आहे. तुर्कस्थान, ग्रीस, हंगेरी मार्गे सीरियन स्थलांतरित जर्मनी आणि पश्चिम युरोपच्या दिशेने जाण्यास बाहेर पडले. यामुळे युरोपातही अंतर्गत गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.