शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंका 'त्या' पाच मच्छिमारांना सोडणार

By admin | Updated: November 12, 2014 12:42 IST

श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. १२ - श्रीलंकेत अंमली पदार्थाच्या तस्करीप्रकरणी मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या तामिळनाडूतील पाचही मच्छिमारांना श्रीलंका सरकारने सोडण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यातील चर्चेनंतर श्रीलंका सरकारने हा निर्णय घेतला असून येत्या दोन - तीन दिवसांमध्ये श्रीलंका बिनशर्त या मच्छिमारांना तुरुंगातून मुक्त करेल असे समजते.
कोलंबो हायकोर्टाने तामिळनाडूतील पाच व श्रीलंकेतील तीन अशा आठ मच्छिमारांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती. यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष महिंद्रा राजपक्षे यांच्यामध्ये चर्चा झाली. या चर्चेनंतर श्रीलंकेतील माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री प्रभा गणेशन यांनी श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांशी चर्चा केल्याचे वृत्त आहे. 'श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष मृत्यूदंडाची शिक्षा झालेल्या पाचही मच्छिमारांना माफ करण्यास तयार असून लवकरच त्यांची सुटका केली जाईल' असे आश्वासन गणेशन यांनी भारतीय उच्चायुक्तांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. 
भारताने श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात मृत्यूदंडाच्या शिक्षेविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी अन्यथा मच्छिमारांच्या सुटकेसाठी आणखी काही महिन्याचा विलंब होईल अशी सूचनाही गणेशन यांनी उच्चायुक्तांना केली आहे. 
 
काय आहे हे प्रकरण ?
२०११ मध्ये श्रीलंकेतील नौदलाने पाच भारतीय आणि श्रीलंकेतील तीन मच्छिमारांना अंमली पदार्थांच्या तस्करी प्रकरणी अटक केली होती. त्यांच्याकडे हिरोईन हे अंमली पदार्थ आढळले होते असा दावा नौदलाने केला होता. कोलंबोतील उच्च न्यायालयाने गेल्या महिन्यात या आठही जणांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली होती.  मात्र कोलंबोतील या निर्णयाचे पडसाद थेट तामिळनाडूतील रामेश्वरम येथे दिसले. या मच्छिमारांच्या नातेवाईकांनी या निर्णयाविरोधात जोरदार विरोध प्रदर्शन केले. अखेर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने त्या मच्छिरांना कायदेशीर मदत उपलब्ध करुन देत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरु केले. श्रींलकेतील भारतीय दुतावासाने मच्छिमारांच्या सुटकेसाठी तेथील सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली व यासाठी श्रीलंकेतील ख्यातनाम वकिलाची नेमणूकही केली आहे.