शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानला 'ही' चूक महागात पडणार; PoK भारतात विलीन करण्याचा मार्ग झाला मोकळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 16:09 IST

Shimla Agreement Deal: १९७२ च्या शिमला करारानुसार हा भाग पाकिस्तानला देण्यात आला होता.

Pakistan On Shimla Agreement Deal: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानावर जोरदार प्रहार केला. या कारवाईत पाकिस्तानासह पीओकेमधील ९ दहशतवादी अड्डे नष्ट करण्यात आले. भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तानने भारतावर ड्रोन हल्ले सुरू केले. ४ दिवस चाललेल्या संघर्षानंतर दोन्ही देशांमध्ये युद्धविराम जाहीर झाला. पण, यादरम्यान पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी भारत आणि पाकमधील १९७२ चा शिमला करार पूर्णपणे संपल्याची घोषणा केली होती. 

२२ एप्रिल रोजी पहलगाम हल्ल्यानंतर भारताने सिंधू पाणी करार थांबवला होता, त्यानंतर पाकिस्तानने शिमला करार स्थगित केला. यासोबतच पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले होते की, भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती पूर्वीसारखीच झाली आहे. आता नियंत्रण रेषा (एलओसी) युद्धविराम रेषा मानली पाहिजे. तसेच, शिमला करार संपल्याचे घोषित करताना पाकिस्तानी संरक्षण मंत्री म्हणाले की, आता पाकिस्तान भारत-पाकिस्तान वाद द्विपक्षीय ऐवजी बहुपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मार्गाने उपस्थित केला जाईल.

भारताकडे एक उत्तम संधी 
दरम्यान, शिमला करार संपुष्टात आणण्याच्या घोषणेचा पाकिस्तानवरच सर्वात वाईट परिणाम होऊ शकतो. कारण, १९७१ च्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धादरम्यान पाकिस्तानने काश्मीरमधील चुंब शहर ताब्यात घेतले होते, जे स्वातंत्र्यापासून भारताचा भाग होते. १९७२ च्या शिमला करारानुसार या शहरावर पाकिस्तानचे नियंत्रण कायम ठेवण्यात आले.

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब महत्वाचे 
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून चुंब क्षेत्र खूप महत्वाचे आहे. १९४९ च्या युद्धविराम करारानुसार चुंबदेखील भारताचा एक भाग होता, परंतु १९६५ च्या युद्धादरम्यान पाकिस्तानने चुंबवर कब्जा केला. युद्धानंतर चुंब पुन्हा भारताच्या ताब्यात आले, परंतु १९७१ मध्ये पाकिस्तानने पुन्हा चुंबवर कब्जा केला. पुढे १९७२ च्या शिमला करारानुसार हे शहर पाकिस्तानचा भाग झाले. पुढे पाकिस्तानने चुंबचे नाव बदलून इफ्तिकाराबाद केले. पाकिस्तानने शहरावर कब्जा केल्यानंतर चुंबमध्ये राहणारी कुटुंबे भारतात स्थलांतरित झाली.

पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांचा दावा
आज चुंब हा पाकव्याप्त काश्मीरचा भाग आहे, परंतु ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी १९७२ चा शिमला करार संपल्याचे जाहीर केले आहे, त्यामुळे भारतीय सैन्याकडे चुंब पुन्हा भारतात जोडण्याचा पर्याय आहे. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPOK - pak occupied kashmirपीओकेIndiaभारत