शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

शाहबाज यांच्या मानहानीचे प्रकरण; इम्रान खान यांना कोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2020 05:43 IST

पाकिस्तान । नवाज शरीफ यांना वाचवण्यासाठी लाच देऊ केल्याचा दावा भोवला

लाहोर : पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या मानहानीच्या खटल्यात न्यायालयाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना नोटीस जारी केली आहे. शरीफ यांनी पाकिस्तान तहरिक-ए-इन्साफच्या प्रमुखांवर दाखल केलेल्या या खटल्याची लवकरात लवकर सुनावणी व्हावी, अशी मागणी केली आहे. मागील तीन वर्षांपासून ही सुनावणी प्रलंबित आहे.शाहबाज शरीफ यांनी देशाचे ७० वर्षीय माजी पंतप्रधान व त्यांचे मोठे बंधू नवाज शरीफ यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेला पनामा पेपर खटला मागे घेण्यासाठी एका मित्रामार्फत ६.१ कोटी डॉलर देण्याची तयारी दर्शवली होती, असा दावा केला होता, असे वक्तव्य इम्रान खान यांनी एप्रिल २०१७ मध्ये केले होते. तथापि, इम्रान खान यांनी पैसे देऊ करणाऱ्या शाहबाज यांच्या मित्राचे नाव घेतले नव्हते.

लाहोरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने १० जून रोजी सुनावणी करण्यासंबंधीच्या शाहबाज यांच्या अर्जावर शुक्रवारी लक्ष केंद्रित केले. त्यात त्यांनी म्हटले होते की, इम्रान खान हे मागील तीन वर्षांपासून लेखी उत्तर दाखल करण्यात अयशस्वी झाले आहेत. या खटल्यात काहीही खास अशी प्रगती झालेली नाही. शाहबाज यांच्या वकिलाने म्हटले होते की, या खटल्यातील ६० सुनावणीपैकी ३३ सुनावणीत खान यांच्या वकिलांनी ३३ वेळा स्थगन देण्याची मागणी केली होती. मागील सुनावणीत न्यायालयाला सांगितले होते की, खान यांचे मुख्य कायदेशीर सल्लागार बाबर अवान हे कोरोनामुळे इस्लामाबादहून लाहोरला येऊ शकत नाहीत. त्यावेळी सुनावणी २२ जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. आपल्या मानहानीच्या बदल्यात शाहबाज यांनी ६.१ कोटी डॉलरच्या भरपाईची मागणी केली होती. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश सुहैल अंजुम यांनी पंतप्रधान इम्रान खान यांना १० जूनपर्यंत लेखी उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.‘इम्रान यांना पंतप्रधान पदावर राहण्याचा अधिकार उरणार नाही’च्पीएमएल-एनच्या प्रवक्त्या मरियम औरंगजेब यांनी सांगितले की, पंतप्रधान इम्रान खान या खटल्यात पुरावा सादर करू शकणार नाहीत. त्यांना ६.१ कोटी डॉलर देण्याची आॅफर कोणी दिली होती, त्यांनी तो पुरावा दाखल करावाच, असे त्यांना माझे आव्हान आहे.च्ते १० जून रोजी पुरावे सादर करण्यास असमर्थ ठरले तर ते खोटारडे आहेत, हे सिद्ध होईल. त्यामुळे त्यांना नॅशनल असेम्ब्लीचा सदस्य व पंतप्रधान या पदावर राहण्याचा नैतिक अधिकार राहणार नाही. त्यामुळे त्यांचा खरा चेहरा समोर येईल. इम्रान खान हे या खटल्यात मागील तीन वर्षांपासून दूर पळत आहेत. त्याचप्रमाणे ते फॉरेन फंडिंग केस खटल्यापासून सहा वर्षे व इतर खटल्यांपासून दोन वर्षांपासून पलायन करीत आहेत.

टॅग्स :Imran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तान