शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
3
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
4
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
5
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
6
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
7
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
8
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
9
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
10
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
11
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
12
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
13
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
14
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
15
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
16
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
17
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
18
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
19
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
20
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
Daily Top 2Weekly Top 5

मोदींनी इम्रान खान यांना टाळलं; एकाच परिषदेत असूनही संवाद नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 22:25 IST

मोदींनी खान यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं

बिश्केक: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बिश्केकमधील एससीओच्या परिषदेदरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना पूर्णपणे टाळलं. मोदी आणि इम्रान खान एकाच डिनर टेबलवर होते. मात्र मोदींनी खान यांच्याशी संवाद साधला नाही. मोदींनी त्यांच्याकडे पाहणंदेखील टाळलं. एबीपी न्यूजनं याबद्दलचं वृत्त दिलं आहे. त्याआधी मोदींनी या परिषदेला जाण्यासाठी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करणंदेखील टाळलं. मोदींनी बिश्केकमधील परिषदेला जाताना पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर करावा, असं पाकिस्तान सरकारनं म्हटलं होतं. मात्र मोदींनी पाकिस्तानच्या हवाई हद्दीचा वापर केला नाही.आठ देशांचा समावेश असलेल्या एससीओ परिषदेला आजपासून किरगिझस्तानमधल्या बिश्केकमध्ये सुरुवात झाली. या परिषदेदरम्यान मोदींनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन, चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यासोबत चर्चा केली. मात्र त्यांनी इम्रान खान यांच्यासोबत संवाद साधणं टाळलं. मोदींनी खान यांच्याकडे पाहिलंदेखील नाही. फेब्रुवारी महिन्यात पुलवामात मोठा दहशतवाद झाला. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले. एससीओ परिषदेदरम्यान मोदींनी चीनच्या अध्यक्षांशी संवाद साधताना पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्ताननं दहशतवादाविरोधात कठोर पावलं उचलण्याची गरज असल्याचं मोदी आणि जिनपिंग यांनी म्हटलं. दक्षिण आशिया दहशतवादमुक्त व्हावा, असं भारताला वाटतं. मात्र त्यासाठी पाकिस्तानकडून कोणत्याही हालचाली होत नसल्याचं मोदी जिनपिंग यांना म्हणाले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीImran Khanइम्रान खानPakistanपाकिस्तानchinaचीनTerrorismदहशतवादpulwama attackपुलवामा दहशतवादी हल्ला