शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

इसिसच्या जिहादींसाठी पेड मधुचंद्र

By admin | Updated: May 28, 2015 23:52 IST

इसिसच्या ताब्यातील प्रदेशात किंवा खलिफाच्या राजधानीत म्हणजेच रक्का येथे जिहादींसाठी मधुचंद्राची सोय करण्यात आली आहे.

बैरूत : इसिस वा इस्लामिक संघटना जिहादींना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळे फंडे शोधत असून, नव्या फंड्यानुसार इसिसच्या ताब्यातील प्रदेशात किंवा खलिफाच्या राजधानीत म्हणजेच रक्का येथे जिहादींसाठी मधुचंद्राची सोय करण्यात आली आहे. सिरियातील लढाऊ जिहादी अबू बिलाल अल होम्सी याचे ट्युनिशियातील मुलीशी आॅनलाईन चॅटिंग सुरू होते. नुकताच त्यांचा विवाह झाला असून, रक्काच्या उपाहारगृहात मांसाहारी जेवण, त्यानंतर युफ्रेटस नदीच्या काठी केलेला विहार व आइस्क्रीम खात मारलेल्या गप्पा, असे त्याचे जीवन आहे. यासाठी लागणारे पैसे इसिसने त्याला दिलेल्या १,५०० डॉलर्सच्या भेटीतून खर्च झाले आहेत. विवाहानंतर होम्सी व त्याच्या पत्नीसाठी रोख डॉलरच्या भेटी, घर सजविण्यासाठी मदत व सर्वांत अखेरीस मधुचंद्र! विवाहानंतर कोणालाही यापेक्षा अधिक काय हवे असते? असे अल होम्सी म्हणतो. इसिसचे साम्राज्य गेल्या १८ महिन्यांपासून चालू असून , रक्का ही त्यांची राजधानी आहे. आतापर्यंत शिरच्छेद, हत्याकांडे, अनैतिक संबंधासाठी दगडाने ठेचून मारणे, अशा शिक्षा येथे दिल्या जात असत. येथील प्रत्येक चेकनाक्यावर सशस्त्र रक्षक उभे असून, ये-जा करणाऱ्या लोकांवर त्यांचे लक्ष असते. कोणी शरीयाचे उल्लंघन करीत आहे का? याचा वास त्यांना बरोबर येतो. या रक्षकांपैकी अनेकांच्या घरात इराकमधून अपहरण केलेल्या याझदी वंशाच्या मुली व महिला असून, त्यांना गुलाम म्हणून ठेवण्यात आले आहे. इसिस गट अत्याचारासाठी प्रसिद्ध आहे. (वृत्तसंस्था)जिहादींचे जीवन सावरण्यासाठी कल्याणकारी योजना आखण्यात आल्या आहेत. अरब देश, मध्य आशिया व अमेरिकेतून आलेले युवक व युवती यांच्यासाठी वेगळे जीवन आखण्यात आले आहे. येथे फक्त युद्ध नाही, नागरी जीवनही आहे; पण त्याचे नियंत्रण इसिसकडे आहे. येथे स्थलांतरित झालेल्या युवकांना विवाह करण्यासाठी मदत केली जाते. होम्सी याने स्काईपवरून अनेक टप्प्यांत ही मुलाखत दिली असून, त्यातून इसिसमध्ये सामील झालेल्या युवकांच्या वैयक्तिक आयुष्याचे दर्शन घडते.