शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीच्यावेळी पाकिस्तानने मदत केली, आता त्यांनाच तालिबानने धमकी दिली; लाल मशीद ऑपरेशनपासून सुरू झाले वैर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 15:31 IST

तालिबानला १९९४ मध्ये मजबूत बनवण्याठी पाकिस्तानने मोठी मदत केली होती.

पाकिस्तान आणि तालिबान या दोन्हीमध्ये आधी खूप जवळचे संबंध होते. पाकिस्तानशिवायतालिबान्यांचे काहीच होत नव्हते. त्यांना पाकिस्तानच पैसे पुरवत होता. पण, डिसेंबर महिन्यात अफगाणिस्तानच्या पाक्तिका प्रांतामध्ये पाकिस्तानने मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानने तालिबान्यांचे एक प्रशिक्षण केंद्र होते. या हल्ल्यात ४६ जणांचा मृ्त्यू झाला. यात सर्वात जास्त लहान मुले आणि महिला होत्या. या घटनेमुळेच पाकिस्तान आणि तालिबानमध्ये मोठा वाद सुरू झाला. 

२०२५ मध्ये उड्डाण, २०२४ मध्ये जमिनीवर उतरलं विमान, कसा घडला हा टाइम ट्रॅव्हलचा चमत्कार?

या हल्ल्यानंतर तालिबानने पाकिस्तानचा बदला घेण्याचे ठरवले आणि अवघ्या चार दिवसांनी पाकिस्तानच्या सीमेवर प्रत्युत्तरादाखल हल्ला केला. या हल्ल्यात १९ पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचा दावा तालिबानने केला आहे, तर ३ अफगाण नागरिकांनाही आपला जीव गमवावा लागला आहे. 

तालिबानची स्थापना १९९४ मध्ये अफगाणिस्तानातील कंदाहारमध्ये झाली. पाकिस्तानने त्यांना संघटित करण्यात आणि मजबूत करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. तालिबानला सुरुवातीपासूनच पाकिस्तानकडून मोठा पाठिंबा मिळू लागला. आयएसआयने अनेक दशकांपासून आर्थिक आणि लष्करी मदत देऊन तालिबानला सांभाळण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

१९९६ मध्ये, पाकिस्तान, सौदी अरेबिया आणि युएई ने अफगाणिस्तानच्या तालिबानच्या इस्लामिक अमिरातीला कायदेशीर सरकार म्हणून मान्यता दिली. नेहमीच तालिबानच्या पाठीशी असलेला पाकिस्तान आज शत्रू बनला आहे. अफगाणिस्तानात सत्ता हाती घेतल्यानंतर पाकिस्तानच्या सीमावर्ती भागात हल्ले वाढले आहेत.

तालिबानच्या विरोधानंतर पाकिस्तानने तालिबानच्या स्थापनेतील आपली भूमिका वारंवार नाकारली आहे. पाकिस्तान आणि तालिबान यांच्यातील युद्धाची खरी सुरुवात २००७ मध्ये पाकिस्तानातील लाल मशीद ऑपरेशन होती. इस्लामाबादची लाल मशीद कट्टर इस्लामी कारवायांच्या केंद्रस्थानी होती. येथूनच दहशतवादी संघटनांना पाठबळ मिळाले.

२००७ मध्ये लाल मशिदीच्या विद्यार्थ्यांनी इस्लामाबादमधील मसाज सेंटरवर हल्ला करून ९ जणांचे अपहरण केले होते. यानंतर ३ जुलै २००७ रोजी पाकिस्तानी लष्कराने ऑपरेशन सायलेन्स सुरू केले. या कारवाईत १०० हून अधिक लोक मारले गेले. यानंतर पाकिस्तानमध्ये तहरीक-ए-पाकिस्तान चा जन्म झाला. यानंतर पाकिस्तानमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले.

टॅग्स :TalibanतालिबानPakistanपाकिस्तान