शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

अंकारा बॉम्बस्फोटातील मृतांची संख्या ९५

By admin | Updated: October 11, 2015 23:32 IST

तुर्कस्तानची राजधानी अंकारात कुर्दसमर्थकांच्या शांतता फेरीत झालेल्या दोन बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ९५ झाली आहे.

अंकारा : तुर्कस्तानची राजधानी अंकारात कुर्दसमर्थकांच्या शांतता फेरीत झालेल्या दोन बॉम्बस्फोटांतील मृतांची संख्या ९५ झाली आहे. शनिवारी झालेल्या या बॉम्बस्फोटाचा निषेध करण्यासाठी रविवारी हजारो लोकांनी शांतता रॅली काढली. त्यात सहभागी झालेल्या लोकांनी कुर्दविरोधकांचा घोषणा देऊन निषेध केला.दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला घडवून आणल्याचा संशय आहे. तुर्कस्तानात १ नोव्हेंबर रोजी निवडणुका होत आहेत. शहरातील मुख्य रेल्वेस्टेशनजवळ झालेल्या या बॉम्बस्फोटांमुळे देशात तणाव वाढला आहे. सरकारने कुर्द बंडखोरांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. त्यामुळे अगोदरच वातावरण तणावपूर्ण बनले असताना ही घटना घडली आहे.तुर्कस्तानचे पंतप्रधान अहमत दावुतोल्गू यांनी २४६ जण जखमी झाल्याचे सांगितले. त्यापैकी ४८ जणांची प्रकृती गंभीर आहे. तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तैयप एर्दोगन यांनी या घटनेचा निषेध करताना देशाची एकता आणि अखंडतेवर हल्ला असल्याचे म्हटले आहे. यापूर्वी २०१३ मध्ये रेयहानली येथे झालेल्या दोन बॉम्बस्फोटांत ५० जण ठार झाले होते. दरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी या बॉम्बस्फोटांबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. व्हाईट हाऊसतर्फे जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, दहशतवाद्यांनी उभ्या केलेल्या आव्हानास आम्ही तुर्कस्तानसोबत आहोत. (वृत्तसंस्था)