कॅलिफोर्नियात आता इच्छामृत्यूला परवानगी

By Admin | Updated: October 7, 2015 02:55 IST2015-10-07T02:55:52+5:302015-10-07T02:55:52+5:30

कॅलिफोर्नियात इच्छामृत्यूची परवानगी देण्यात आली असून अमेरिकेत इच्छामृत्यूची परवानगी देणारे ते पाचवे राज्य ठरले आहे. इच्छामृत्यूची परवानगी देणाऱ्या या विधेयकावर

Now allow death for death in California | कॅलिफोर्नियात आता इच्छामृत्यूला परवानगी

कॅलिफोर्नियात आता इच्छामृत्यूला परवानगी

लॉस एंजलिस : कॅलिफोर्नियात इच्छामृत्यूची परवानगी देण्यात आली असून अमेरिकेत इच्छामृत्यूची परवानगी देणारे ते पाचवे राज्य ठरले आहे. इच्छामृत्यूची परवानगी देणाऱ्या या विधेयकावर राज्याचे गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी स्वाक्षरी केली असून आता असाध्य आजारांनी ग्रस्त रुग्णांना इच्छामृत्यूचा अधिकार मिळाला आहे. गव्हर्नर जेरी ब्राऊन यांनी यासंदर्भात बोलताना सांगितले की, हा निर्णय घेण्यापूर्वी आपण कॅथोलिक चर्चच्या सदस्यांशी आणि डॉक्टरांशी चर्चा केली आहे. त्यानंतरच या निर्णयापर्यंत आम्ही आलो आहोत. (वृत्तसंस्था)

Web Title: Now allow death for death in California