अमेरिका-इराण नव्हे, तर चीन आणि भारत आहेत समुद्राचे खरे 'सुलतान'...या भागात वर्चस्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 20:02 IST2026-04-14T20:01:34+5:302026-04-14T20:02:26+5:30

जगातील सुमारे ८० टक्के व्यापार समुद्री मार्गांनी होतो.

Not America-Iran, but China and India are the real 'sultans' of the sea... dominating this area | अमेरिका-इराण नव्हे, तर चीन आणि भारत आहेत समुद्राचे खरे 'सुलतान'...या भागात वर्चस्व

अमेरिका-इराण नव्हे, तर चीन आणि भारत आहेत समुद्राचे खरे 'सुलतान'...या भागात वर्चस्व

मध्यपूर्वेतील तणाव पाहता जागतिक राजकारण आणि आर्थिक शक्तीचे केंद्र आता जमिनीवरून समुद्राकडे सरकत असल्याचे स्पष्ट होत आहे. जगातील सुमारे ८० टक्के व्यापार समुद्री मार्गांनी होत असल्याने, महत्त्वाच्या सागरी मार्गांवरील नियंत्रण हेच देशांच्या सामर्थ्याचे मुख्य मापदंड ठरत आहे.

दक्षिण चीन समुद्रात चीनचे वर्चस्व

दक्षिण चीन समुद्र या भागातून जगातील सुमारे ३३ टक्के व्यापार होतो. चीनने कृत्रिम बेटे उभारून आणि लष्करी उपस्थिती वाढवून या भागात आपली पकड मजबूत केली आहे.

अरब सागरात प्रादेशिक स्पर्धा

अरब सागर हा आशिया, युरोप आणि आफ्रिकेला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या भागात भारत, पाकिस्तान आणि इराणचा प्रभाव आहे.

सुवेज कालवा आणि भूमध्य सागराचे महत्त्व

मेडिटेरीयन समुद्र हा सुवेज कालव्याचे प्रवेशद्वार आहे. या कालव्यामुळे आशिया आणि युरोपमधील सर्वात कमी अंतराचा समुद्री मार्ग उपलब्ध होतो. या भागावर इजिप्तचा ताबा असल्याने त्याचे महत्त्व अधिक वाढते. बाब-अल-मंदेब आणि सुवेज कालवा मिळून सुमारे २३ टक्के जागतिक व्यापार हाताळतात.

बंगालच्या उपसागरात भारताची मजबूत उपस्थिती

बंगालचा उपसागर हा आशियान देशांच्या व्यापारासाठी महत्त्वाचा असून, भारताने नौदल तळ आणि रणनीतिक भागीदारीद्वारे येथे आपला प्रभाव वाढवला आहे.

उत्तर समुद्रात ब्रिटन-नॉर्वेचा दबदबा

उत्तर समुद्र हा युरोपसाठी ऊर्जा आणि व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. येथे युके आणि नॉर्वेचे वर्चस्व आहे. इंग्लिश चॅनल (३०%) आणि जिब्राल्टर सामुद्रधुनी (२८%) हेही महत्त्वाचे व्यापार मार्ग आहेत.

ब्लॅक सीमध्ये रशियाची पकड

ब्लॅक सी हा युरोप आणि आशियाला जोडणारा महत्त्वाचा समुद्री मार्ग आहे. राशिया या भागात प्रभावी मानला जातो. या सर्व भागांमध्ये तणाव निर्माण झाल्यास जागतिक पुरवठा साखळीवर तात्काळ परिणाम होतो.

Web Title : चीन और भारत: समुद्र के असली सुल्तान, प्रमुख क्षेत्रों में वर्चस्व

Web Summary : वैश्विक व्यापार समुद्री मार्गों की ओर बढ़ रहा है। चीन का दक्षिण चीन सागर पर दबदबा है, जबकि भारत बंगाल की खाड़ी में प्रभाव बढ़ा रहा है। स्वेज नहर जैसे जलमार्गों का नियंत्रण महत्वपूर्ण है, जो वैश्विक आपूर्ति श्रृंखला को प्रभावित करता है।

Web Title : China and India: True Sultans of the Seas, Dominating Key Regions

Web Summary : Global trade shifts to sea routes. China dominates the South China Sea, while India asserts influence in the Bay of Bengal. Control of key waterways like the Suez Canal remains vital, impacting global supply chains.