उत्तर कोरियात 99 टक्के मतदान; किम जोंगच्या देशात निवडणुका कशा घेतल्या जातात? जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2026 19:52 IST2026-03-16T19:51:50+5:302026-03-16T19:52:56+5:30

North Korea: उत्तर कोरियाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन यांनीही बजावला मतदानाचा हक्क!

North Korea: 99 percent voting in North Korea; How are elections held in Kim Jong's country? Find out | उत्तर कोरियात 99 टक्के मतदान; किम जोंगच्या देशात निवडणुका कशा घेतल्या जातात? जाणून घ्या...

उत्तर कोरियात 99 टक्के मतदान; किम जोंगच्या देशात निवडणुका कशा घेतल्या जातात? जाणून घ्या...

North Korea Election: उत्तर कोरियात सर्वोच्च विधिमंडळ, म्हणजेच सुप्रीम पीपल्स असेंबबली (Supreme People's Assembly) साठी रविवारी (15 मार्च) मतदान पार पडले. या निवडणुकीत सुमारे 99.1 टक्के मतदारांनी मतदान केल्याचा दावा उत्तर कोरियाच्या निवडणूक आयोगाने केला आहे. देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन (Kim Jong Un) यांनीही या निवडणुकीत मतदान केले. या संदर्भातील त्यांच्या मतदानाचा व्हिडिओ उत्तर कोरियाच्या सरकारी माध्यमांनी प्रसिद्ध केला आहे. 

दरम्यान, उत्तर कोरियात मतदान कसे घेतले जाते आणि मतदानाची टक्केवारी सर्वाधिक का असते? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. विशेष म्हणजे, इतके मतदान होण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्येही इतकेच मतदान झाले आहे.

पाच वर्षांसाठी निवडणूक

उत्तर कोरियातील सर्वोच्च विधिमंडळ, म्हणजे Supreme People's Assembly असून त्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा असतो. हेच सदन देशातील कायदे तयार करणे आणि सरकारी धोरणे ठरवण्याचे काम करते. या सदनात एकूण 687 जागा आहेत. या सर्व जागांवर उमेदवार प्रामुख्याने Workers' Party of Korea आणि त्याच्या सहयोगी गटांकडून उभे केले जातात. 

उत्तर कोरियातील सरकार कसे चालते?

उत्तर कोरिया हा एकपक्षीय साम्यवादी शासनव्यवस्थेचा देश आहे. देशाचे सर्वोच्च नेते Kim Jong Un यांच्याकडेच सर्व प्रमुख अधिकार आहेत. किम जोंग उन हे केवळ राजकीय नेतेच नाहीत, तर ते उत्तर कोरियन सैन्याचे सर्वोच्च कमांडरदेखील आहेत. देशातील महत्त्वाचे निर्णय अखेरीस त्यांच्या नेतृत्वाखालीच घेतले जातात.

उत्तर कोरियात निवडणुका कशा होतात?

उत्तर कोरियाच्या संविधानानुसार 17 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार आहे. मात्र मतदान न करणे हे जवळपास देशद्रोहासारखे मानले जाते, त्यामुळे जवळपास सर्व नागरिक मतदान करतात. निवडणुकीपूर्वी मतदार यादी जाहीर केली जाते आणि त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडते. चीन आणि रशियामध्ये राहणाऱ्या उत्तर कोरियन नागरिकांनाही मतदानाचा अधिकार दिला जातो.

मतदान बॅलेट पेपरद्वारे केले जाते. मतदारांना उमेदवाराच्या नावासमोर ठप्पा मारायचा असतो. एखाद्या उमेदवाराच्या विरोधात मतदान करायचे असल्यास ते सार्वजनिकपणे नोंदवावे लागते, अशीही व्यवस्था आहे.

प्रत्येक मतदारसंघात एकच उमेदवार

उत्तर कोरियातील निवडणूक व्यवस्थेची खास बाब म्हणजे, प्रत्येक जागेसाठी सामान्यतः एकच उमेदवार असतो. स्थानिक स्तरावर चर्चेच्या प्रक्रियेद्वारे उमेदवारांची निवड केली जाते. राजकीय विश्लेषकांच्या मते, उत्तर कोरियातील निवडणुका प्रतीकात्मक स्वरूपाच्या असतात. स्थानिक पातळीवरील असंतोष कमी करण्यासाठी आणि जनतेचा सहभाग दर्शवण्यासाठी या निवडणुका घेतल्या जातात.

Web Title : उत्तर कोरिया में 99% मतदान: किम जोंग उन के चुनाव कैसे होते हैं, जानें

Web Summary : उत्तर कोरिया में सुप्रीम पीपुल्स असेंबली चुनावों में 99% मतदान हुआ। 17 वर्ष से अधिक उम्र के नागरिक वोट कर सकते हैं; विरोध सार्वजनिक रूप से घोषित किया जाना चाहिए। प्रत्येक जिले में आमतौर पर केवल एक उम्मीदवार होता है, जिसे स्थानीय स्तर पर चुना जाता है। यह प्रक्रिया प्रतीकात्मक है।

Web Title : North Korea's 99% Election Turnout: How Kim Jong Un's Elections Work

Web Summary : North Korea boasts 99% voter turnout in Supreme People's Assembly elections. Citizens over 17 can vote; opposition must be publicly declared. Each district typically has only one candidate, chosen locally. The process is largely symbolic.