शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरियात अखेर एफजीएमवर बंदी!

By admin | Updated: June 9, 2015 00:54 IST

गेली अनेक शतके चालू असणाऱ्या फिमेल जेनिटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच स्त्री जननांग कापण्याच्या विकृत प्रथेवर अखेर सोमवारी नायजेरियाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

अबुजा/मुंबई : गेली अनेक शतके चालू असणाऱ्या फिमेल जेनिटल म्युटिलेशन (एफजीएम) म्हणजेच स्त्री जननांग कापण्याच्या विकृत प्रथेवर अखेर सोमवारी नायजेरियाने बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रथेमध्ये स्त्रियांच्या जननांगांचा काही भाग कापला जाई किंवा पूर्णपणे छाटला जाई. साधारणत: डझनभर आफ्रिकन देशांमधील ही कुप्रथा रूढ आहे. त्यातही नायजेरिया, इजिप्त आणि इथिओपिया या देशांत त्याचे प्रमाण सर्वाधीक आढळून येत असे. 

आफ्रिकेतील अनेक देशांत टोळ््यांमध्ये एफजीएमची प्रथा सुरु होती व आहे. वांशिक भेदांनुसार एफजीएमच्या पद्धतीत बदल होत असे. पुरुषसत्ताक मानसिकतेच्या अतिरेकातून आणि स्त्रियांना कोणत्याही प्रकारचे सुख अथवा आनंद घेण्याचा अधिकार मिळू नये अशा विकृत विचारांमधून एफजीएचा उदय झाला होता. स्त्रीत्वाचा नैसर्गिक आधारही हिसकावून घेणे हाच यामागील खरा उद्देश होता. युनिसेफच्या माहितीनुसार १५ ते ४९ या वयोगटामधील १९.९ दशलक्ष नायजेरियन महिलांना एफजीएचा त्रास सहन करावा लागला होता. अखेर द व्हायोलन्स अगेन्स्ट पर्सन्स (प्रोहिबिशन) अ‍ॅक्ट २०१५ हा कायदा नायजेरियन सिनेटने मंजूर केला आणि नायजेरियाने एफजीएमविरोधात ठाम पाऊल उचलल्याचे सर्व जगाला दाखवून दिले. नायजेरियात नुकतेच सत्तांतर झाले. मावळते राष्ट्रपती गुडलक जोनाथन यांनी आपल्या कारकिर्दीतील शेवटचे काम म्हणजे एफजीएमवर बंदी घालून नवनिर्वाचित राष्ट्रपती मुहम्मुदु बुहारी यांच्याकडे सत्ता सोपविली आहे. नायजेरियाच्या या कृतीचे जगभरातून कौतुक होत असून शोषित आफ्रिकन महिलांसाठी हा आशेचा नवा किरण ठरू पाहात आहे. इजिप्तने सात वर्षांपूर्वी एफजीएमवर बंदी घातली आहे. आता नायजेरियाने बंदी घातल्यावर लायबेरिया, सुदान, मालीसुद्धा असे पाऊल उचलतील अशी अपेक्षा आहे.एफजीएम काय आहे?एफजीएम ही महिलांची सुंता आहे. स्त्रियांच्या जननांगातील योगीलिंग (मदनध्वज), तसेच बाह्य त्वचेची आवरणे चक्क कापून टाकली जात. बऱ्याचवेळेस केवळ मूत्रविसर्जनासाठी मार्ग ठेवून त्यांच्यावर अत्याचारच केले जात. यामुळे स्वच्छतेचा प्रश्न निर्माण होत असेच शिवाय अनेक रोगांची व संसर्गाची लागण महिलांना होत असे. प्रसुतीमार्गात अडथळे आल्याने महिलांना नरकयातना भोगाव्या लागत. मूत्रमार्गात संसर्ग झाल्याने हजारो महिलांना वेदना अंगावर वागवतच जीवन जगावे लागले. सर्वात दुर्देवी म्हणजे हे करताना निर्जंतुकीकरणाची कसलीही काळजी न घेतलेल्या ब्लेड कात्री यासारख्या धारधार साधनांनी हा अत्याचार केला जातो.--------------बंधनात ठेवण्यासाठीच एफजीएमचा वापरलैंगिकतेचा आविष्कार हा एका अर्थाने सुखाचा नैसर्गिक आविष्कार असतो, त्यामुळे स्त्रीला कोणतेही सुख मिळूच नये यासाठी एफजीएमचा अक्षरश: हत्यार म्हणून वापर झाला. तिच्या लेैंगिकतेवरही बंधन आणले गेले. या प्रथेला धर्माचाही आधार देण्यात आला. पण एफजीएममुळे लाखो स्त्रियांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. आता नायजेरियाने त्यावर बंदी घातली आहे, त्यांचे स्वागत करू - वंदना खरे, लेखिका,नाटककार, ‘व्हजायना मोनोलॉग’च्या अनुवादक