शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 22:25 IST

भारताने बेकायदेशीर प्रवेशाविरुद्ध कठोर कारवाई सुरू केल्यामुळे नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना भारत-नेपाळ सीमेवर प्रवास करू नये असा इशारा दिला आहे.

नेपाळमधील चिनी दूतावासाने आपल्याच नागरिकांना एक नवीन इशारा दिलाय. यामध्ये त्यांना भारत-नेपाळ सीमा भागात प्रवास करणे टाळण्याचा सल्ला दिलाय. काही दिवसात भारताने बेकायदेशीर सीमा ओलांडणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केल्यानंतर हा इशारा दिला. गेल्या एका महिन्यात दूतावासाकडून असा हा तिसरा इशारा दिला. 

चीनी दूतवासाने शुक्रवारी अधिकृत निवेदन प्रसिद्ध केले. "वारंवार इशारा देऊनही काही चिनी नागरिक सीमा भागात प्रवास करत आहेत, ज्यामुळे त्यांना बेकायदेशीर प्रवेशाच्या आरोपाखाली अनेक प्रकरणांमध्ये ताब्यात घेण्यात आले, असंही यात म्हटले. 

"भारत आणि नेपाळचे नागरिक सीमापार प्रवासादरम्यान ओळखपत्र दाखवून एकमेकांच्या देशात प्रवास करू शकतात, परंतु हा नियम परदेशी नागरिकांना लागू होत नाही. चीनने आपल्या नागरिकांकडे वैध भारतीय व्हिसा असल्याशिवाय ते नेपाळमधून भारतात प्रवास करू शकत नाहीत, अशा सूचना दिल्या. 

चीनी दूतावासाने म्हटले आहे की, भारतात बेकायदेशीर प्रवेशासाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. जरी एखाद्या व्यक्तीने अजाणतेपणे भारतीय सीमेत प्रवेश केला तरी त्याला अटक केली जाऊ शकते आणि दोन ते आठ वर्षांचा तुरुंगवास किंवा मोठा दंड होऊ शकतो. याशिवाय, या प्रकरणात जामिनाची तरतूद नाही.

टॅग्स :chinaचीनIndiaभारत