शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar : "उद्धव ठाकरे लंडनच्या नालेसफाईची पाहणी करायला गेलेत का?"; आशिष शेलारांचा खोचक सवाल
2
दहावीच्या निकालासंदर्भात मोठी अपडेट! सोमवारी दुपारी लागणार निकाल, असा पाहा रिझल्ट
3
Fact Check: अमित शाह म्हणाले की, निवडणुकीत गॅरंटी दिल्यानंतर मोदी विसरतात?; 'तो' Video अपूर्ण
4
Hardik Pandya Divorce: नताशाला ७०% संपत्ती अन् 'कंगाल' पांड्या; हार्दिकबद्दल का रंगतेय चर्चा?
5
तुम्हीच ठरवा कोण जिंकतेय...! योगेंद्र यादवांच्या २६० च्या दाव्यावर प्रशांत किशोरांची प्रतिक्रिया, म्हणाले...
6
'वर्षभरापासून मी बेरोजगार आहे कारण...' रत्ना पाठक शाहांनी सांगितलं सत्य
7
मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! ३० मे पासून ५ टक्के, तर ५ जून पासून १० टक्के पाणी कपात
8
निवृत्त IAS अधिकाऱ्याच्या घरात चोरट्यांचा दरोडा, विरोध केल्याने पत्नीची हत्या
9
Gold Rates Today : ३ दिवसांत सोनं ₹२००० नं झालं स्वस्त, पाहा २४ कॅरेट Goldचा आजचा भाव
10
Fact Check: मनोज तिवारींनी लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारला? जाणून घ्या व्हायरल व्हिडीओमागील सत्य
11
छत्तीसगड: दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; 9 जणांचा मृत्यू झाल्याची भीती
12
मराठमोळ्या देवदत्त नागेचं नशीब उजळलं, थेट राजामौलींच्या सिनेमात चमकणार!
13
दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वेवर चालू ट्रकमधील सामानाची चोरी; धाडस पाहून लावाल डोक्याला हात
14
Arvind Kejriwal : "भाजपामध्ये उत्तराधिकारीवरून भांडण सुरू, मोदींना अमित शाहांना..."; केजरीवालांचा मोठा दावा
15
पाणी कसे वाचवावे? महापालिकेने दिल्या मुंबईकरांना टिप्स; शॉवर बंद, नळ सुरु ठेवून दात घासणे, दाढी करणे टाळा
16
हृदयद्रावक! वडिलांच्या तेराव्यासाठी आलेल्या मुलाचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
17
Vodafone Ideaच्या शेअरमध्ये ७% तेजी, एक्सपर्ट बुलिश; गुंतवणूकदारांच्याही उड्या
18
दुसऱ्या नवऱ्याचे विवाहबाह्य संबंध, दलजीत कौरच्या घटस्फोटाचं कारण समोर; म्हणाली...
19
स्टार प्रवाह वाहिनीवरील या दोन लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप
20
हाताला सलाईन, रुग्णालयाच्या बेडवर झोपलेला दिसला मुनव्वर फारूकी, चाहते चिंतेत

PM मोदींचा नवा विक्रम; युट्यूबवर सर्वाधिक सबस्क्राईबर्स असलेले 'वर्ल्ड लीडर'

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 4:18 PM

काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका अहवालानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आंतरराष्ट्रीय लोकप्रियता सर्वपरिचीत आहे. जगातील सर्वात लोकप्रिय राजकीय नेते म्हणून भारताचे पंतप्रधान नरेद्र मोदी अव्वल स्थानी आहेत. अर्थातच मोदींना सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांचीही संख्या कोट्यवधीमध्ये आहे. त्यामुळे, मोदींच्या ट्विटर, इंस्टा आणि युट्यूब अकाऊंटवरुन मिलियन्स लोकांपर्यंत ते सहज पोहोचतात. नुकतेच नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने तब्बल २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार केला आहे. विशेष म्हणजे २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पार करणारे पहिले राजकीय नेते आहेत.  

काही दिवसांपूर्वीच आलेल्या एका अहवालानुसार नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरले आहेत. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार, नरेंद्र मोदी यांना तब्बल ७६ टक्के रेटिंग मिळाले आहे. हे रेटिंग २९ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीतील डेटाच्या आधारे जारी करण्यात आले आहे. महत्वाचे म्हणजे पंतप्रधान मोदी यांचे डिसअप्रूव्हल रेटिंगही इतर नेत्यांच्या तुलनेत कमी आहे. ग्लोबल लीडर अप्रूव्हल रेटिंगनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर, दुसऱ्या क्रमांकावर मेक्सिकोचे राष्ट्रपती आंद्रेझ मॅन्युअल, तिसऱ्या क्रमांकावर स्वित्झर्लंडच्या राष्ट्रपती अलेन बारसेट, ब्राझीलचे राष्ट्रपती लुला दा सिल्वा, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी हे आहेत. त्यामुळे, लोकप्रिय नेते असतानाही मोदींच्या सोशल मीडिया फॉलोअर्सची संख्याही लक्षवेधी आहे.  नरेंद्र मोदींच्या अधिकृत युट्यूब चॅनेलने २० मिलियन्स म्हणजेच २ कोटी सबस्क्राईबर्सचा टप्पा पूर्ण केला आहे. त्यांनी त्यांच्या युट्यूब चॅनेलवरुन आत्तापर्यंत २३ हजार व्हिडिओ अपलोड केले आहेत. या सबस्क्राईबर्सच्या संख्येसह मोदींनी सोशल मीडियावर नवीन विक्रम स्वत:च्या नावे केला आहे. युट्यूबवर २ कोटी सबस्क्राईब असलेले जगातील पहिले राजकीय नेते बनण्याचा बहुमान मोदींना मिळाला आहे.  दरम्यान, नरेंद्र मोदी मीडियावर आणि सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या प्रत्येक दैनंदिनी घटनांची माहिती ते शेअर करतात. त्यासोबतच, विविध कार्यक्रमातील सहभाग आणि जाहीर संबोधणाचे प्रक्षेपणही त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन केले जाते. ट्विटरवर नरेंद्र मोदींचे ९४ मिलियन्स म्हणजेच ९ कोटी ४० लाख फॉलोअर्स आहेत. तर, फेसबुकवरील त्यांच्या फॉलोअर्सची संख्याही मिलियन्समध्ये आहे. आता, त्यांनी युट्यूबवरील सर्वाधिक सबस्क्राईबर्स असलेला राजकीय नेता होण्याचा लौकिक मिळवला आहे.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीSocial Mediaसोशल मीडियाYouTubeयु ट्यूबTwitterट्विटर