शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२१ तास चर्चा करूनही अमेरिका-इराणमध्ये करार का झाला नाही? व्हान्स यांनी सांगितली Inside Story
3
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
4
विकसित भारतासाठी प्रगती, निसर्ग आणि संस्कृतीचा त्रिवेणी संगम आवश्यक: पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
6
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
7
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
8
दादर-रत्नागिरी पॅसेंजर पुन्हा दादरवरून धावणार? व्यवहार्यता अहवालावरच पुढील निर्णय अवलंबून
9
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
10
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
11
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
12
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
13
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
14
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
15
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
16
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
17
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
18
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
19
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
20
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही त्यांना परत घेतोय, पण…’’, ट्रम्प यांच्यासमोरच अमेरिकेतून हाकललेल्या भारतीयांबाबत मोदींचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2025 09:03 IST

Narendra Modi-Donald Trump Meeting : हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचं अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर देशात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या नागरिकांना अमेरिकेतून हाकलण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेंतर्गत अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या १०० भारतीयांनाही अमेरिकेतून भारतात पाठवण्यात आले होते. या नागरिकांना माघारी धाडताना अमेरिकेने दिलेल्या वागणुकीवरून मोठा वाद निर्माण झाला होता. दरम्यान, याबाबत डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घेतलेल्या संयक्त पत्रकार परिषदेमध्ये एका पत्रकाराने विचारणा केली असता नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं आहे. आम्ही अमेरिकेत बेकायदेशीर राहणाऱ्या भारतीयांना परत घेत आहोत. मात्र आमच्यासाठी ही गोष्ट इथेच थांबत नाही, असे नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. 

या मुद्द्यावर आपली भूमिका स्पष्ट करताना डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच मोदींनी सांगितले की, हा प्रश्न केवळ भारताचा नाही आहे. जागतिक दृष्टीकोनातून पाहिल्यास जे लोक बेकायदेशीररीत्या एखाद्या देशात राहतात, त्यांना तिथे राहण्याचा कुठलाही कायदेशीर अधिकार नाही, अशी आमची स्पष्ट भूमिका आहे. आता भारत आणि अमेरिकेबाबत बोलायचं झाल्यास जो खरा भारतीय नागरिक असेल आणि तो अमेरिकेत बेकायदेशीरपणे राहत असेल, तर त्याला परत घेण्यास भारत तयार आहे, असेही नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले. या विधानाच्या माध्यातून मोदींनी भारतात. बेकायदेशीररीत्या राहणारे बांगलादेशी आणि रोहिंग्यांबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मोदी पुढे म्हणाले की, हे लोक सामान्य कुटुंबातील मुलं असतात. त्यांना मोठमोठी स्वप्नं दाखवली जातात. बहुतांश लोकांना दिशाभूल करून आणलं जातं. त्यामुळे मानव तस्करीमध्ये गुंतलेल्या या संपूर्ण इको सिस्टिमवर वार करण्याची आवश्यकता आहे. मानव तस्करी बंद करण्यासाठी या प्रकारच्या इकोसिस्टिमला संपवण्यासाठी भारत आणि अमेरिका मिळून प्रयत्न करत आहेत.

गरीब लोक आपली धनदौलत विकून येतात. त्यांना स्वप्न दाखवली जातात. हा त्यांच्यावरही होणारा अन्याय आहे. या पूर्ण इकोस्टिस्टिमविरोधात आमची लढाई सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प हेसुद्धा या इकोसिस्टिमला पराभूत करण्याच्या लढाईत भारताला मदत करतील, असा मला विश्वास आहे, असेही मोदींनी शेवटी सांगितले.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतUnited Statesअमेरिका