नरेंद्र मोदी मुस्लिमविरोधी - इसिस

By Admin | Updated: December 3, 2015 14:44 IST2015-12-03T11:26:39+5:302015-12-03T14:44:52+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मुस्लमिविरोधी असून तेच इस्लामचा सर्वात मोठा शत्रू असल्याची टीका करत इशिसने भारतावर हल्ला करण्याचा इशारा दिला.

Narendra Modi anti-Muslim - ISIS | नरेंद्र मोदी मुस्लिमविरोधी - इसिस

नरेंद्र मोदी मुस्लिमविरोधी - इसिस

नवी दिल्ली, दि. ३ - भारताविरुद्धच्या युद्धासाठी इसिसने (इस्लामिक स्टेट) जिहादींच्या संघटनांचा विस्तार करण्याची प्रतिज्ञाच केली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुस्लिमविरोधी असून ते आपला सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले आहे. तसेच भारतात दहशतवादी कारवाई करण्याची धमकीही दिली आहे. मंगळवारी जिहादींसाठीच्या व्यासपीठावर ही धमकी इसिसने ऑनलाइन प्रसिद्ध केली.

इसिसने ब्लॅक फ्लॅग्ज नावाच्या जाहीरनाम्यात भारतातील राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केेले आहे. तसेच हिंदूंची चळवळ वाढत असून गाईचे मांस खाणा-या मुस्लिमांना ते ठार मारत आहेत. पंतप्रधान मोदी हे उजव्या विचारसरणीचे राष्ट्रवादी नेते असून मुस्लिमांविरोधातील भविष्यातील युद्धासाठी शस्त्रास्त्रांची पूजा करतात, असे इसिसने म्हटले आहे. 

आगामी काळात भारतासह देशांमध्ये दहशतवादाचा प्रसार करणार असल्याचे इसिसने नमूद केले आहे. आम्ही सीरियाबाहेर पडून भारत, पाकिस्तान, बांग्लादेश आणि अफगाणिस्तानसह अनेक देशांमध्ये घुसणार असल्याचा इशाराही इसिसने दिला आहे. 

 

Web Title: Narendra Modi anti-Muslim - ISIS