शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
4
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
5
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
6
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
7
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
8
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
9
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
10
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
11
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
12
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
13
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
14
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
15
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
16
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
17
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
18
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
19
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
20
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
Daily Top 2Weekly Top 5

‘मोदींकडून सार्क नेत्यांना आमंत्रण हे चांगले संकेत’

By admin | Updated: May 24, 2014 04:28 IST

भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी शपथविधी होत आहे. या सोहळ्यासाठी पाकिस्तानसह अन्य सार्क देशातील नेत्यांना आमंत्रण पाठविणे एक मजबूत आणि सकारात्मक संकेत आहे,

वॉशिंग्टन : भारताचे भावी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा सोमवारी शपथविधी होत आहे. या सोहळ्यासाठी पाकिस्तानसह अन्य सार्क देशातील नेत्यांना आमंत्रण पाठविणे एक मजबूत आणि सकारात्मक संकेत आहे, असे मत अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने व्यक्त केले. दक्षिण व मध्य आशियाकरिता सहायक परराष्ट्रमंत्री निशा देसाई-बिस्वाल म्हणाल्या की, पंतप्रधानांच्या शपथविधीला सार्क नेत्यांनी येणे मजबूत व सकारात्मक संकेत आहेत. शपथविधी सोहळा कसा व्हावा, हा निश्चितच भावी पंतप्रधानांचा निर्णय आहे. बिस्वाल पुढे म्हणाल्या की, ओबामा प्रशासनाकडून भारताच्या नव्या सरकारला पुढील कार्यपद्धतीवर निर्णय घेण्यास वेळ दिला जाईल. त्यानंतरच या आधारे नवी दिल्लीशी संपर्क करण्यात येईल. त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीत भारतीयांनी दिलेल्या स्पष्ट कौलामुळे आम्ही उत्साही आहोत. आम्ही संपूर्ण परिसरात सुरक्षा व समृद्धीकरिता भावी पंतप्रधान मोदी व त्यांच्या टीमसह काम करण्यास इच्छुक आहोत. गुजरातमध्ये २००२ मध्ये झालेल्या घटनांबाबत चिंतित असल्याचेही बिस्वाल यांनी स्वीकार केले. अमेरिकेचा दृष्टिकोन याबाबत अधिक स्पष्ट राहिला आहे. पुढे बिस्वाल म्हणाल्या की, भारतीय मतदारांनी भावी पंतप्रधानाच्या रूपाने मोदींना स्पष्ट बहुमत दिले आहे. भारताला निर्धारित लक्ष्य गाठण्यासाठी आम्हीसुद्धा मिळून काम करण्यास तयार आहोत. राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी मोदींना दिलेल्या निमंत्रणाबाबत स्पष्ट सांगितले होते की, अमेरिकेत मोदींचे स्वागत आहे. मोदींचे येथे स्वागतच होईल, असेही निशा देसाई यांनी स्पष्ट केले. (वृत्तसंस्था) ते पंतप्रधानपदी विराजमान असल्याने ते ए १ व्हिसा श्रेणीतून अमेरिकेत प्रवेश करतील. अमेरिकेत येणार्‍या सर्व राष्ट्राध्यक्षांसाठी ए १ श्रेणी सर्वश्रेष्ठ आहे. (वृत्तसंस्था)