शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
3
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
4
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
5
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
6
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
7
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
8
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
9
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
10
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
11
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
12
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
13
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
14
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
15
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
16
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
17
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
18
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
19
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

ह्युस्टनमध्ये मोदी, ट्रम्प येणार साथ साथ, हजारोंच्या जनसमुदायाला करणार संबोधित 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2019 10:18 AM

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत.

वॉशिंग्टन - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळवलेला मोठा विजय आणि जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवण्याचा धोरणात्मक निर्णय घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात प्रथमच अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यादरम्यान, नरेंद्र मोदी हे संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेला संबोधित करणार आहेत. मात्र या संबोधनापूर्वी मोदी टेक्सास राज्यातील ह्युस्टन येथे होणाऱ्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असून, या कार्यक्रमात मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प हे उपस्थित ५० हजारहून अधिक लोकांना संबोधित करणार आहेत.  मेडिसन स्क्वेअर आणि सिलिकॉन व्हॉली येथील कार्यक्रमांनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अमेरिकेतील हा तिसरा सर्वात मोठा कार्यक्रम असेल. या कार्यक्रमात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षही सहभागी होणार असल्याने हाऊडी मोदी हा कार्यक्रम ऐतिहासिक ठरणार आहे. या कार्यक्रमात डोनाल्ड ट्रम्प हे सहभागी होणार असल्याच्या वृत्ताला व्हाइट हाऊसने दुजोरा दिला आहे. या कार्यक्रमामुळे भारत आणि अमेरिकेमधील द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत होणार आहेत.  दरम्यान, ह्युस्टनमध्ये होणाऱ्या या कार्यक्रमात भारत आणि अमेरिकेतील द्विपक्षीय संबंध, व्यापार, संस्कृती यावर चर्चा होणार आहे. या कार्यक्रमात मोदी आणि ट्रम्प यांच्यासोबत अनेक मोठ्या व्यक्तीही सहभागी होण्याची शक्यता आहे. तसेच जगातील दोन देशांचे प्रमुख एकाच मंचावरून हजारोंच्या जनसमुदायाला संबोधित करण्याची ही पहिलीच वेळ असेल. 

 डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत अमेरिकन संसदेतील ५० हून अधिक खासदार आणि गव्हर्नर मोदींच्या या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. रिपब्लिकन पार्टीकडून सर्वात मोठा चेहरा म्हणून डोनाल्ड ट्रम्प उपस्थित असतील. तर डेमोक्रॅटिक पार्टीकडूनसुद्धा अनेक मोठे नेते या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे. अमेरिकेमध्ये पुढील वर्षी अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. तसेच त्यात भारतीय मतदार हे महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे मोदींसोबत कार्यक्रमात सहभागी होऊन मतदारांना आकर्षित करण्याचा अनेक नेत्यांचा प्रयत्न आहे.    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पUnited StatesअमेरिकाIndiaभारत