मनोरुग्ण सामान्यांपेक्षा तिप्पट धूम्रपान करतात

By Admin | Updated: June 7, 2015 01:27 IST2015-06-07T01:27:50+5:302015-06-07T01:27:50+5:30

मानसिक आजार असलेले लोक सामान्य लोकांपेक्षा तीनपट अधिक धूम्रपान करतात. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसने

Menopause smokes three times more than usual | मनोरुग्ण सामान्यांपेक्षा तिप्पट धूम्रपान करतात

मनोरुग्ण सामान्यांपेक्षा तिप्पट धूम्रपान करतात

लंडन : मानसिक आजार असलेले लोक सामान्य लोकांपेक्षा तीनपट अधिक धूम्रपान करतात. पब्लिक हेल्थ इंग्लंड (पीएचई) आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिसने (एनएचएस) केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली.
धूम्रपानामुळे मानसिक अस्वस्थता वाढू शकते, तसेच रुग्ण घेत असलेल्या औषधांचा प्रभाव ५० टक्क्यांनी कमी होऊ शकतो. त्यामुळे मनोविकार रुग्णालये धूम्रपानवर्जित क्षेत्र घोषित केले जावे, असे पीएचईचे म्हणणे आहे; मात्र स्मोकर्सच्या (धूम्रपान करणारे) अधिकारांची बाजू घेणारी संघटना फॉरेस्टला हे मान्य नाही. मानसिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असलेल्या रुग्णांनाही धूम्रपानासाठी सामान्य नागरिकांप्रमाणे स्वातंत्र्य मिळायला हवे, असे या संघटनेचे म्हणणे आहे.
पीएचईच्या सर्व्हेनुसार, मानसिक आजाराच्या जवळपास ६४ टक्के रुग्णांना तंबाखूचे व्यसन आहे, तर सामान्य लोकांत केवळ १८ टक्के लोकांनाच हे व्यसन आहे. (वृत्तसंस्था)

ब्रिटनमधील नऊ टक्के मानसिक आरोग्य केंद्रांना यापूर्वीच धूम्रपानवर्जित क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. धूम्रपानाच्या व्यसनामुळे मनोरुग्णांचे आयुष्य दहा ते २० वर्षांनी घटू शकते. जे लोक धूम्रपान सोडतात, त्यांचा आत्मविश्वास वाढतो, असे लंडनमधील मॉडस्ले रुग्णालयाच्या मॅरी येट्स यांनी सांगितले. मात्र, मानसिक आजार असलेल्या गॅरी नेव्हन यांना मानसिक आरोग्य केंद्रात धूम्रपान न करणे मान्य नाही. त्या म्हणाल्या, आम्ही चांगले वाटावे यासाठी रुग्णालयात येतो. कधी कधी सिगारेट ओढल्यामुळे चांगले वाटते. स्मोकर्स गु्रपचे संचालक सायमन क्लार्क यांनी मानसिक आरोग्य केंद्रांना धूम्रपान वर्जित क्षेत्र घोषित करण्याच्या पीएचईच्या सल्ल्याची निंदा केली. ते म्हणाले, धूम्रपानामुळे चिंता आणि तणाव कमी होतो, असे धूम्रपान करणाऱ्या अनेकांचे म्हणणे आहे.

Web Title: Menopause smokes three times more than usual