शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

महिंदा राजपाक्षेंच्या भावांविरुद्ध गंभीर तक्रारीनंतर चौकशी सुरू

By admin | Updated: January 19, 2015 02:40 IST

श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचे बंधू गोटाभाया आणि बासिल राजपाक्षे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरविली आहेत.

कोलंबो : श्रीलंकेचे माजी अध्यक्ष महिंदा राजपाक्षे यांचे बंधू गोटाभाया आणि बासिल राजपाक्षे यांच्या विरुद्ध करण्यात आलेल्या गंभीर तक्रारीनुसार पोलिसांनी चौकशीची चक्रे फिरविली आहेत. महिंदा राजपाक्षे यांचे एकेकाळी निष्ठावंत समजले जाणारे त्यांच्याच राजवटीतील माजी जनसंपर्कमंत्री मर्विन सिल्वा यांनी महिंदा यांच्या या दोन भावांविरुद्ध पोलिसांच्या गुन्हा अन्वेषण विभागाकडे तक्रार केली आहे. गोटाभाया हे गुंडाची टोळी चालवितात. २००९ मध्ये त्यांनी संडे लीडरचे संपादक लसांथा विक्रमतुंगा यांच्या हत्येचे आदेश दिले होते, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. मर्विन सिल्वा यांच्या आरोपाबाबत चौकशी केली जात आहे, असे पोलीस प्रवक्ते अजित रोहना यांनी सांगितले. या तक्रारीत बासिल राजपाक्षे यांचेही नाव गोवण्यात आले आहे. बासिल हेही माजी आर्थिक विकासमंत्री आहेत.अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महिंदा राजपाक्षे यांच्याविरुद्ध पोलीस आणि लाचलुचपत आयोगाकडेही तक्रार देण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांवरील अलीकडच्या हल्ल्यांचा मुद्दाही उपस्थित केल्याचे सिल्वा यांनी सांगितले. सरकारचे पाठबळ असलेल्या गुंडांच्या टोळ्या पांढऱ्या व्हॅनमधून पत्रकारांचे अपहरण करून त्यांना मारहाण करण्यासाठी येत. तथापि, राजपाक्षे सरकारने याकडे कानाडोळा केला. माझ्या मुलावर महिंदा यांच्या मुलाने हल्ला केल्याचा आरोपही सिल्वा यांनी केला आहे.