हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर करडी नजर

By Admin | Updated: May 28, 2015 23:57 IST2015-05-28T23:57:21+5:302015-05-28T23:57:21+5:30

नौदल प्रमुख धवन:

Look at China's movements in the Indian ocean | हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर करडी नजर

हिंदी महासागरातील चीनच्या हालचालींवर करडी नजर

दल प्रमुख धवन:
नवी दिल्ली: हिंदी महासागर क्षेत्रात चीनची उपस्थिती वाढली असतानाच चीनी नौदलाच्या वाढत्या हालचालींवर करडी नजर ठेवण्यात आली असल्याचे नौदल प्रमुख ॲडमिरल आर. के. धवन यांनी गुरुवारी सांगितले.
२००८ पासून हिंदी महासागरात समुद्री चाच्यांविरुद्धच्या मोहिमेत काही पाणबुड्यांसोबतच पीपल्स लिबरेशन आर्मीची (पीएलए) जहाजे तैनात करण्यात आली आहेत.
भारतीय सुरक्षा प्रतिष्ठांनाना भारताजवळील जलक्षेत्रात चीनी पाणबुड्यांची उपस्थित आढळून आली असून पाकिस्तान, मालदीव आणि श्रीलंकेसारख्या शेजारील देशांमधील त्यांच्या विकासात्मक हालचाली चिंतेचा विषय आहे.
येथे आयोजित चार दिवसीय नौदल कमांडर अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकारांशी बोलताना नौदल प्रमुखांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, पीएलए नौदलाच्या हालचालींवर भारतीय नौदलाने करडी नजर ठेवली आहे. हिंदी महासागर आणि आमच्या तटवर्तीय क्षेत्राच्या सुरक्षेची जबाबदारी नौदलाची आहे आणि ही जबाबदारी चोखपणे बचावण्यासाठी आमची जहाजे आणि विमाने नेहमीच सतर्क असतात. चीनने अलीकडेच संरक्षणावर काढलेल्या श्वेतपत्रिकेबाबत विचारलेल्या प्रश्नाला नौदलप्रमुख उत्तर देत होते. या श्वेतपत्रिकेत चीनने आपल्या समुद्री तटांपासून दूर खुल्या समुद्र क्षेत्राच्या संरक्षणासाठी प्रथमच नौदलाची व्याप्ती वाढविण्याचा विचार मांडला आहे.
या वृत्ताला फारसे महत्त्व न देताना ते म्हणाले की, प्रत्येक देशाच्या नौदलातर्फे आपल्या योजना आखल्या जात असतात आणि ही अत्यंत सामान्य बाब आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Look at China's movements in the Indian ocean