कझाकस्ताननं उघडला भारतासाठी मौल्यवान 'खजिना'; न्यूक्लियर पॉवर प्लांटसाठी इंधनाचं टेन्शन संपणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:23 IST2026-02-26T09:22:46+5:302026-02-26T09:23:51+5:30

काझाटोमप्रॉम युरेनियम खाणकाम, दुर्मिळ धातू प्रक्रिया आणि बेरिलियम, टॅंटलम उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री यामध्ये काम करते. या कंपनीची सर्व उत्पादने निर्यात केली जातात

Kazakhstan to supply fresh uranium to India under new deals to fuel nuclear power plants | कझाकस्ताननं उघडला भारतासाठी मौल्यवान 'खजिना'; न्यूक्लियर पॉवर प्लांटसाठी इंधनाचं टेन्शन संपणार

कझाकस्ताननं उघडला भारतासाठी मौल्यवान 'खजिना'; न्यूक्लियर पॉवर प्लांटसाठी इंधनाचं टेन्शन संपणार

नवी दिल्ली - जगातील सर्वात मोठा युरेनियम उत्पादक देश असलेल्या कझाकस्तानने भारताला मोठी भेट दिली आहे. कझाकस्तानने भारतातील अणुऊर्जा प्रकल्पांना इंधन देण्यासाठी एक नवीन करार केला आहे. या करारांतर्गत कझाकस्तानने भारताला मोठ्या प्रमाणात युरेनियम पुरवठा करण्यास सहमती दर्शविली आहे.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

एका वृत्तानुसार, कझाकस्तानची सरकारी मालकीची युरेनियम कंपनी 'काझाटोमप्रॉम'ने भारताच्या अणुऊर्जा विभागाशी अलीकडेच झालेल्या चर्चेनंतर शुक्रवारी ही घोषणा केली. भारत आणि कझाकस्तानमधील मागील कराराची मुदत संपली. त्यानंतर काही वर्षांपासून भारत आणि कझाकस्तान यांच्यात युरेनियम पुरवठा करारावर वाटाघाटी सुरू होत्या.  अलीकडच्या काही महिन्यांत या वाटाघाटींना आणखी गती मिळाली आहे त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून आता हा करार मार्गी लागला आहे. 

वर्षानुवर्षे भारतासोबत करार 

जानेवारी २००९ मध्ये 'काझाटोमप्रॉम'ने भारताला २,१०० टन युरेनियम पुरवठा करण्यासाठी न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) सोबत करार केला. जुलै २०१५ मध्ये त्यांनी २०१५-१९ काळात ५,००० टन युरेनियम पुरवण्यासाठी भारताच्या अणुऊर्जा विभागाशी करार केला होता. 

काझाटोमप्रॉम ही कझाकस्तानची सरकारी मालकीची कंपनी

काझाटोमप्रॉम युरेनियम खाणकाम, दुर्मिळ धातू प्रक्रिया आणि बेरिलियम, टॅंटलम उत्पादनांचे उत्पादन आणि विक्री यामध्ये काम करते. या कंपनीची सर्व उत्पादने निर्यात केली जातात. ही कंपनी सरकारच्या नियंत्रणाखाली आहे. ज्यात समरुक्काझिना स्टेट फंडकडे ६२.९९% हिस्सा, कझाक अर्थ मंत्रालयाकडे १२.०१% हिस्सा आणि २५% हिस्सा स्वतंत्र आहे.

भारत युरेनियम कुठून मिळवतो?

सध्या भारत रशिया, कझाकस्तान, उझबेकिस्तान, फ्रान्स आणि कॅनडासह अनेक देशांमधून युरेनियम इंधन आयात करतो. २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियन सरकारने भारताला युरेनियम विकण्याचा निर्णय घेतला तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियासोबत करार केला. मात्र त्यानंतर ऑस्ट्रेलियाने आपला निर्णय मागे घेतला. भारतात ६,७८० मेगावॅट क्षमतेच्या २२ अणुभट्ट्या आहेत. यापैकी आठ अणुभट्ट्या स्वदेशी युरेनियमवर चालतात. उर्वरित १४ अणुभट्ट्या आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या (IAEA) सुरक्षा देखरेखीखाली आहेत आणि आयात केलेले युरेनियम वापरण्यास त्या पात्र आहेत.
 

Web Title : कज़ाख़स्तान ने भारत के लिए खोला मूल्यवान खजाना; परमाणु ईंधन का संकट होगा दूर

Web Summary : कज़ाख़स्तान भारत के परमाणु ऊर्जा संयंत्रों के लिए यूरेनियम की आपूर्ति करेगा, जिससे ईंधन की चिंता दूर होगी। एक नया समझौता पिछले समझौते की समाप्ति के बाद हुआ है, जो दुनिया के सबसे बड़े उत्पादक से यूरेनियम की निरंतर आपूर्ति सुनिश्चित करता है। भारत अपने रिएक्टरों को बिजली देने के लिए कई देशों से यूरेनियम का आयात करता है।

Web Title : Kazakhstan Opens Valuable Treasure for India; Nuclear Fuel Tension Ends

Web Summary : Kazakhstan will supply uranium to India for its nuclear power plants, resolving fuel concerns. A new agreement follows the expiration of a previous pact, ensuring a consistent uranium supply from the world's largest producer. India imports uranium from multiple countries to power its reactors.

टॅग्स :Indiaभारत