शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
4
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
5
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; IPL अन् ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
6
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
7
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
8
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

जी-7 देशांच्या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांच्यात काश्मीरप्रश्नी चर्चा होण्याची शक्यता  

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2019 12:45 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.  

बिआरित्झ - पंतप्रधान नरेंद्र मोदी आज फ्रान्समध्ये होणाऱ्या जी-7 देशांच्या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत.  यावेळी मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात द्विपक्षीय चर्चा होण्याची शक्यता असून, या चर्चेमध्ये काश्मीरचा विषय निघू शकतो. जी-7 देशांमध्ये फ्रान्स, जर्मनी, इटली, अमेरिका, कॅनडा आणि जपान यांचा समावेश आहे. जगातील सात धनाढ्य देशांच्या या परिषदेत भारत हा विशेष निमंत्रित सदस्य आहे. जागतिक अर्थव्यस्थेत आलेली मंदी आणि व्यापार युद्धाबाबत वाढत असलेली चिंता या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. त्यामुळे बिआरित्झ येथे जेव्हा जी-7 परिषदेच्या मंचावर विविध देशांचे नेते एकत्र येतील तेव्हा त्यांच्याकडून व्यापार युद्धाबाबत सकारात्मक निर्णयाची अपेक्षा जगाला असेल.  जगातील सर्वात विकसित देशांच्या या समुहाच्या वार्षिक बैठकीत अॅमेझॉनच्या जंगलांमध्ये लागलेली आग, ब्रेक्झिटनंतर युरोपमध्ये निर्माण झालेला गतिरोध संपवणे तसेच व्यापारामधील तणावाचे वातवरण कमी करणे अशा मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. दरम्यान, अॅमेझॉनच्या जंगलात लागलेली आग ही या बैठकीच्या अजेंड्यावर सर्वात वर असेल, असे फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्राँ यांनी देशाला संबोधित करताना सांगितले होते. या विषयी केवळ चर्चा करून भागणार नाही, तर काहीतरी योग्य पावले उचलली पाहिजेत, असे मॅक्राँ यांनी म्हटले आहे. 

टॅग्स :IndiaभारतUnited StatesअमेरिकाNarendra Modiनरेंद्र मोदीDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प