शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

इस्तंबुल विमानतळ स्फोटांनी हादरले, 36 जणांचा मृत्यू, 147हून अधिक जखमी

By admin | Updated: June 29, 2016 09:11 IST

टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले.

ऑनलाइन लोकमतइस्तंबुल, दि. 29 - टर्कीचे प्रमुख शहर असलेल्या इस्तंबुल येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ मंगळवारी रात्री उशिरा झालेल्या दोन स्फोटांनी हादरले. या भीषण स्फोटात आतापर्यंत 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 147 हून अधिक जण जखमी आहेत. हा हल्ला दहशतवादी संघटना असलेल्या इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया म्हणजेच इसिसनं केल्याची शक्यता तुर्कीनं व्यक्त केली आहे. मृतांचा आकडा 50 पर्यंत वाढण्याची भीती तुर्की सरकारच्या सूत्रांकडून व्यक्त करण्यात आली आहे, असं वृत्त द गार्डियन या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.  

इस्तंबुल विमानतळावरून मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक होते. द गार्डियनच्या माहितीनुसार एके 47 असलेल्या काही अज्ञात बंदुकधारी दहशतवाद्यांनी इस्तंबुल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. त्यानंतर या बंदुकधारी दहशतवाद्यांनी आत्मघाती स्फोट घडवून आणला. अचानक झालेल्या या दोन स्फोटानंतर उपस्थित प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला. अनेक जण आपला जीव वाचविण्यासाठी जमिनीवर झोपले तर काहींनी इमारतीमध्ये धाव घेतली. या वर्षातील ही सर्वात मोठी घटना मानली जाते.

या हल्ल्यानंतर टर्कीच्या राष्ट्राध्यक्षांनी दहशतवादाविरोधात सर्वांना एकत्र येऊन लढण्याचं आवाहन केलं आहे. या वर्षातील इस्तंबुलमध्ये झालेला हा चौथा मोठा दहशतवादी हल्ला आहे. कुठल्याही दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. या हल्ल्यानंतर इस्तंबुल विमानतळावरुन सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. 
 
मुस्लिमांचा पवित्र रमजानचा महिना सुरु असताना तीन आत्मघातकी हल्लेखोरांनी हा हल्ला केला असे इस्तंबुलचे राज्यपाल वासीप साहीन यंन सांगितले. सुरक्षा कॅमे-यांनी हे दोन्ही बॉम्बस्फोट टिपले असून, एका क्लिपमध्ये टर्मिनल बिल्डींगच्या प्रवेशव्दारातून आगीचा मोठा लोळ येताना दिसत असून, भेदरलेले प्रवासी सैरवैरा पळत आहेत. 
 
दुस-या व्हिडीओमध्ये काळपोषाख परिधान केलेला एक दहशतवादी इमारतीमध्ये पळताना दिसत आहे. स्फोटाच्या आवाजानंतर विमानतळावरील प्रवासी सर्व दिशांना पळत सुटले असे एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले. कुर्दीश बंडखोर आणि इसिसच्या दहशतवाद्यांवर या हल्ल्याचा संशय आहे. मार्च महिन्यात युरोपमधील ब्रसेल्स विमानतळावर अशाच पद्धचीने बॉम्बस्फोट झाले होते. दोन्ही विमानतळावरील आत्मघातकी हल्ल्याची पद्धत एकसारखीच आहे. ब्रसेल्स हल्ल्यात ३२ जण ठार झाले होते.