शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणला अण्वस्त्रे देऊ नका, ते क्षणातच विध्वंस घडवतील", ट्रम्प यांनी 'नाटो'ला केलं सावध!
2
आजचे राशीभविष्य - २ मे २०२६, आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक क्षेत्रांत लाभ होतील, कुटुंबात सुख-शांती नांदेल
3
ट्रम्प चिडले, पण फेमस झाल्या जॉर्जिया मेलोनी! तरुणाई तर त्यांच्यामागे खंबीरपणे उभी राहिली
4
मुंबईत ‘ऑपरेशन व्हाइट स्ट्राइक’, १,७४५ कोटींचे अमली पदार्थ जप्त; ३४९ किलो कोकेनही हस्तगत
5
IPL 2026: वैभव-यशस्वीची धडाकेबाज जोडी फ्लॉप! तरी RR निर्धास्त; KL राहुलच्या खेळीने DC ला मोठा दिलासा
6
पुणे-मुंबई प्रवासाच्या स्वप्नाचा एक टप्पा पूर्ण, लवकरच नामकरण; अर्थव्यवस्थेला ७०००० कोटींची गती
7
महामुंबईत सायकल ट्रॅकचा ‘ट्रॅक’च हरवला!, सायकल आहे, पण चालवायची कुठे?; कोट्यवधींचा खर्च वाया
8
पेट्रोल-डिझेल दरवाढ उंबरठ्यावर?; व्यावसायिक गॅस सिलिंडरही महागले, निवडणुका आटोपताच तगडा झटका
9
कुजबुज! ठाण्यात पाऊल ठेवू देणार नाही म्हणणारे शिंदेसेनेचे पदाधिकारी राऊतांच्या स्वागताला पोहचले
10
पहिल्याच दिवशी मिसिंग लिंकवर ज्वलनशील पदार्थांची सर्रास वाहतूक; बंदी केवळ कागदावरच
11
‘परदेशांत भ्रमण न केल्यास नागदेवता दंश करेल’; फिर्यादीच्या पैशांवर भोंदू खरात करायचा मौज
12
मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पासाठी सात देशांच्या तंत्रज्ञानाचा वापर; प्रमुख फायदे कोणते?
13
अजबच! बीकेसीत सायकल ट्रॅक बांधण्यासाठी ६० कोटी अन् आता काढण्यासाठी २५ कोटी खर्च केला
14
घरांच्या किमती कमी करण्याची म्हाडावर नामुष्की; विक्रोळीतील १,२२१ घरांच्या किमती ७.५ टक्क्यांनी कमी
15
‘MMC’ निवडणूक झाली, कौन्सिलमध्ये कोण असणार?; नामनिर्देशित की निवडून आलेले?, डॉक्टरांमध्ये संभ्रम
16
मध्य रेल्वेवर उद्या ‘नीट’मुळे ब्लॉक नाही; आज विशेष ब्लॉक, शेवटची लोकल सव्वाअकराची
17
आठ वर्षांच्या मुलीचे जबरदस्तीने चुंबन, आरोपीस ५ वर्ष सक्त मजुरीची शिक्षा, कोर्टानं ठरवलं दोषी
18
...तर अन्नपदार्थांचा उल्लेख धर्माचा अपमान ठरत नाही; शेखर सुमन, भारती सिंह यांना हायकोर्टाचा दिलासा
19
रोहित शेट्टी गोळीबारप्रकरणी १५ आरोपींवर आरोपपत्र दाखल; २ मुख्य आरोपी अद्यापही फरार
20
सहलीत सेल्फीचा मोह जिवावर बेतला, मावळच्या धरणात तीन मित्र बुडाले; एकाला वाचविण्यात यश
Daily Top 2Weekly Top 5

इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 19:56 IST

इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणुप्रकल्पांचेही मोठे नुकसान झाले आहे. या हल्ल्यानंतर इराण देखील प्रत्युत्तरात्मक कारवाई करू शकतो.

इस्त्रायलने इराणवर आज शुक्रवारी मोठा हल्ला केला.या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख मोहम्मद बाघेरी यांचा मृत्यू झाला आहे, तर त्यांच्या क्षेपणास्त्र प्रोग्रॅमचे नेतृत्व करणारे जनरल अमीर अली हाजीजादेह यांचाही मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात इतर अनेक वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेल्याचे वृत्त आहे. इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अणु ठिकाणेंचेही मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान,आता इराण या हल्ल्याचा बदला घेऊ शकतो या भीतीने इस्त्रायल सतर्क झाले आहे. त्यांनी जगभरातील आपले दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. स्वीडनमधील इस्रायलच्या दूतावासाने ही माहिती दिली आहे. बर्लिनमधील दूतावासही बंद करण्यात आले आहे.

'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

इस्रायलने इराणच्या एकूण २० वरिष्ठ लष्करी कमांडरना ठार मारले आहे. तेव्हापासून, इस्रायलला इराणी हल्ल्याची भीती वाटत आहे. कोणत्याही कारवाईला प्रत्युत्तर देता यावे आणि नुकसान कमी करता यावे यासाठी ते आधीच सतर्क आहेत. 'सध्याच्या घडामोडी पाहता, इस्रायल सर्व देशांमधील आपले दूतावास बंद करेल. पुढील सूचना मिळेपर्यंत हे दूतावास बंद राहतील आणि तेथे कॉन्सुलर सेवा पुरवल्या जाणार नाहीत, असं स्वीडनमधील दूतावासाने म्हटले आहे. 

 'येत्या काळात युद्धासारखी परिस्थिती उद्भवू शकते, हे इस्रायलच्या या निर्णयावरून हे स्पष्ट होते. इराणने क्षेपणास्त्र प्रोग्रॅम प्रमुख अमीर अली हाजीजादेह देखील मारला गेल्याची पुष्टी केली आहे.  आता आम्ही या हल्ल्याचा शेवट लिहू अशी धमकी इराणने दिली. तेव्हापासून इस्रायल देखील सतर्क आहे. इराण आणि इस्रायलने त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. शेजारी देश इराक, सीरिया, जॉर्डन आणि लेबनॉन यांनीही त्यांचे हवाई क्षेत्र बंद केले आहे. 

ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली

दोन्ही देशांमधील वाढत्या तणावादरम्यान, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला अणु करारावर स्वाक्षरी करण्याचा इशारा दिला. जर इराणने लवकरच करारावर स्वाक्षरी केली नाही तर हल्ले आणखी तीव्र होतील यामुळे विनाश होईल, असंही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले. 

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी शुक्रवारी इराणला खूप उशीर होण्यापूर्वी करार करण्याचा इशारा दिला. 'अमेरिका जगातील सर्वोत्तम आणि प्राणघातक शस्त्रे बनवते आणि इस्रायलकडे अशी अनेक घातक शस्त्रे आहेत', असं ट्रम्प म्हणाले.

डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर एक निवेदन प्रसिद्ध केले आहे, यामध्ये म्हटले की, "मी इराणला करार करण्यासाठी अनेक संधी दिल्या. मी त्यांना शक्य तितक्या कडक शब्दात सांगितले की ते करा, पण त्यांनी कितीही प्रयत्न केले, कितीही जवळ आले तरी ते ते पूर्ण करू शकले नाहीत. 

टॅग्स :Israelइस्रायलIranइराण