शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताबद्दल लिहिली भलीमोठी पोस्ट; मग मोदी काय म्हणाले? वाचा
2
Balendra Shah: काठमांडूचे 'रॅपर', महापौर बालेंद्र शाह होणार नेपाळचे नवे पंतप्रधान?
3
नेपाळमध्ये लष्कराने सूत्र हातात घेतली, एअर इंडिया-इंडिगोच्या विमान उड्डाणे रद्द
4
आता टेन्शन फ्री होईल मध्यम वर्ग; या ५ सरकारी स्कीम करतील तुमची रिटायरमेंट आणि सेव्हिंग सुपर सेफ, पाहा कसं?
5
कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात
6
Stock Markets Today: शेअर बाजार सुस्साट, निफ्टी २५,००० च्या पार; IT-रियल्टी शेअर्समध्ये जोरदार तेजी
7
सी. पी. राधाकृष्णन : संघस्वयंसेवक ते उपराष्ट्रपतिपदापर्यंतचा चढता आलेख
8
जे कोणालाच जमलं नाही ते आर्यन खानने केलं, 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून दिलं मोठं सरप्राईज
9
Asia Cup 2025: सूर्यकुमारने पाकिस्तानच्या कर्णधाराशी हात मिळवला की नाही? Video झाला व्हायरल
10
Crime: संतापजनक! चालत्या कॅबमध्ये विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन, चालकाला अटक!
11
Genz Protests Nepal: तरुणाईच्या आगीत नेपाळ स्वाहा! नेत्यांच्या भ्रष्टाचाराने जेरीस, सोशल मीडिया बंदीने ओतले तेल
12
हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल 
13
"मी भाऊ कदमकडून खूप काही शिकलो", मनोज वाजपेयीकडून अभिनेत्याचं भरभरुन कौतुक, म्हणाला...
14
भारताच्या 'आयटी'वर नवे संकट! 'या' कंपन्यांवर २५ टक्के कर लावण्याचा अमेरिकी खासदाराचा प्रस्ताव
15
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५: जिभेवर ताबा ठेवावा लागेल, वरिष्ठांशी वाद होण्याची शक्यता
16
'भारत-अमेरिका पक्के मित्र, व्यापार करारावर चर्चा सुरू'; ट्रम्प यांच्या पोस्टला पंतप्रधान मोदींचे उत्तर
17
अग्रलेख: भडकलेली 'जेन-झी'! भारताला अधिक सजग राहावे लागणार
18
टोळीयुद्धाने हादरली नवी मुंबई; गुंड राजकुमार म्हात्रेला मारहाण, खुटारीमध्ये हवेत गोळीबार
19
धुमसते नेपाळ : संसद पेटविली; सर्वोच्च न्यायालय आणि अॅटर्नी जनरल कार्यालयात तोडफोड
20
मालेगाव २००८ बॉम्बस्फोट: प्रज्ञा ठाकूर, पुरोहितसह ६ जणांच्या मुक्ततेला उच्च न्यायालयात आव्हान

"रुग्णालयाखाली बंकर, लाखो डॉलर्सची रोकड आणि सोनं लपवतंय हिजबुल्लाह", IDF चा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2024 10:50 IST

Israel-Hezbollah War: रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचेही इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

Israel-Hezbollah War: इस्रायल आणि हिजबुल्लाह यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेच्या आर्थिक केंद्राची गुप्त माहिती सार्वजनिक केली आहे. बेरूतमधील रुग्णालयाखाली बांधलेल्या बंकरमध्ये हिजबुल्लाहने लाखो डॉलर्सची रोकड आणि सोने लपविल्याचा दावा इस्रायली लष्कराने केला आहे. तसेच, रुग्णालयावर हल्ला करणार नसल्याचे इस्रायली लष्कराने म्हटले आहे.

इस्रायली लष्कराचे (आयडीएफ) प्रवक्ते रिअर ॲडमिरल डॅनियल हगारी म्हणाले, "हे बंकर हिजबुल्लाहचा नेता सय्यद हसन नसराल्लाह याने बांधले होते. तसेच, हे बंकर दीर्घकाळ टिकण्यासाठी डिझाइन केले होते. सध्या बंकरमध्ये लाखो डॉलर्सची रोकड आणि सोने आहे. मी लेबनीज सरकार, लेबनीज अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना आवाहन करतो की, हिजबुल्लाहला हा पैसा दहशत पसरवण्यासाठी आणि इस्रायलवर हल्ला करण्यासाठी वापरू देऊ नका. इस्रायली वायुसेना परिसरावर लक्ष ठेवून आहे. मात्र, आम्ही रुग्णालयावर हल्ला करणार नाही."

रुग्णालयाच्या संचालकांनी दिलं प्रत्युत्तर! इस्रायल खोटे आणि बदनामीकारक दावे करत आहे, असे शिया अमल मूव्हमेंट पार्टीचे लेबनीज खासदार आणि संलग्न रुग्णालय अल-साहेलचे संचालक फादी अलमेह यांनी रॉयटर्सला सांगितले. तसेच, फादी अलमेह यांनी लेबनीज सैन्याला रुग्णालय परिसरात जाण्यास सांगितले आणि आपल्याकडे फक्त ऑपरेटिंग रूम, रूग्ण आणि शवागार असल्याचे दाखवावे असे म्हटले. तसेच, रुग्णालय रिकामी केले जात आहे, असेही फादी अलमेह यांनी सांगितले.

"हिजबुल्लाहवर हल्ले सुरुच राहणार"रविवार आणि सोमवारच्या रात्री विमानांनी अल-कार्द अल-हसनच्या जवळपास ३० ठिकाणांवर हल्ला केला, असे इस्रायलचे चीफ ऑफ जनरल स्टाफ हर्जेई हलेवी यांनी सांगितले. याबद्दल इस्रायलचे म्हणणे आहे की, ही हिजबुल्लाहची आर्थिक शाखा आहे. तसेच, इस्त्रायल हिजबुल्लाहच्या आर्थिक लक्ष्यांवर हल्ले करत राहणार असल्याचे डॅनियल हगारी यांनी सांगितले.

टॅग्स :Israelइस्रायलInternationalआंतरराष्ट्रीय