फ्रान्समध्ये इसिसचा हल्ला, एकाचा मृत्यू

By Admin | Updated: June 26, 2015 16:54 IST2015-06-26T16:54:54+5:302015-06-26T16:54:54+5:30

फ्रान्समधील पूर्वेकडील भागात असलेल्या एका गॅसच्या कारखान्यावर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचे वृत्त असून या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला आहे.

Isis attack in France, death of one | फ्रान्समध्ये इसिसचा हल्ला, एकाचा मृत्यू

फ्रान्समध्ये इसिसचा हल्ला, एकाचा मृत्यू

>ऑनलाइन लोकमत
फ्रान्स, दि. २६ - फ्रान्समधील पूर्वेकडील भागात असलेल्या एका गॅसच्या कारखान्यावर इस्लामिक स्टेट (इसिस) या दहशतवादी संघटनेने हल्ला केल्याचे वृत्त आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.  
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या गॅस कारखान्याच्या गेटजवळ  दहशतवादी येथील स्थानिक वेळेनुसार सकाळी १०च्या सुमारास आले आणि त्यांनी काही वेऴेतच त्यांच्याजवळ असलेली स्फोटके कारखान्याच्या दिशेने फेकून स्फोट घडवून आणला. या हल्ल्यात कारखानाच्या गेटजवळ एका व्यक्तीचे शरिरापासून वेगऴे झालेले डोके मिऴाले आहे, तर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा झेंडाही पोलीसांना मिळाल्याचे समजते.
दरम्यान याप्रकरणी एकाला पोलीसांनी अटक केली असून या हल्ल्यात त्या व्यक्तीचा समावेश आहे की नाही याचा खुलासा अद्याप पोलीसांनी केला नाही. तसेच, शहरात सर्व ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढविण्यात आली आहे.  

Web Title: Isis attack in France, death of one