इराण कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2026 17:00 IST2026-02-22T16:59:06+5:302026-02-22T17:00:31+5:30

Iran warning america: इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे आपला इरादा सांगितला

iran will never bow down tehran masoud pezeshkian challenges donald trump in nuclear showdown us signals full blown war | इराण कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख प्रत्युत्तर

इराण कुणाच्याही दबावापुढे झुकणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर चोख प्रत्युत्तर

Iran warning america: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही काळापासून विविध देशांविरोधात आक्रमक धोरण राबवत आहेत. काही देशांवर दबावतंत्र वापरून त्यांच्याकडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याचाही त्यांची प्रयत्न दिसत आहे. अशातच इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, इराण अमेरिकेच्या दबावापुढे झुकणार नाही.

'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!

कितीही दबाव टाका, झुकणार नाही

मध्य पूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पेझेश्कियान यांचे हे विधान महत्त्वाचे मानले जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतेच म्हटले होते की, अमेरिका इराणवर मर्यादित लष्करी हल्ल्याचा विचार करत आहे. यादरम्यान, अमेरिका आपली दुसरी विमानवाहू जहाज पाठवून मध्य पूर्वेतील आपली लष्करी उपस्थिती वाढवत आहे. अशावेळी इराणमध्ये पॅरालिम्पिक संघाच्या सदस्यांचा सन्मान करण्यासाठी आयोजित समारंभात पेझेश्कियान यांनी स्पष्टपणे ठणकावले की, आम्ही या कोणत्याही प्रकारच्या दबावापुढे झुकणार नाही.

इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव

"जगातील काही देश आम्हाला शरण येण्यास भाग पाडण्यासाठी रांगेत उभे आहेत. पण ज्याप्रमाणे काही देश अडचणींसमोर झुकले नाही, त्याचप्रमाणे आम्ही या समस्या आणि दबावापुढे झुकणार नाही," असे पेझेश्कियान म्हणाले. या महिन्याच्या सुरुवातीला तेहरानने त्यांच्या अणु कार्यक्रमावर पुन्हा चर्चा सुरू केल्यानंतर इराणी राष्ट्राध्यक्षांचे हे विधान आले आहे. गेल्या आठवड्यात जिनेव्हा येथे चर्चेची दुसरी फेरी झाली.

वाटाघाटी आणि युद्ध दोन्हीसाठी सज्ज

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव वाढत असतानाच, त्यांनी केलेली चर्चा एकूणच सकारात्मक असल्याचे सांगितले जात आहे, परंतु या चर्चेत कोणत्याही निष्कार्षापर्यंत पोहोचणे शक्य झाले नाही. त्यामुळे कुठलाही करार होऊ शकलेला नाही. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची यांनी सांगितले की ते राजनैतिक तोडग्याच्या जवळ पोहोचले आहेत. अमेरिकेसोबत कराराचा मसुदा अंतिम करण्याची योजना आखली जात आहे. ते यावेळी युद्धाच्या तयारीबद्दलही बोलले. आम्ही वाटाघाटींसाठी जितके तयार आहोत, तितकेच युद्धासाठीही तयार आहोत, असे अराघची म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर ट्रम्प यांनी इराणवर मर्यादित लष्करी हल्ल्याबद्दलता विचार बोलून दाखवला.

Web Title : ईरान का रुख: ट्रम्प की धमकी के बाद, दबाव में नहीं झुकेंगे!

Web Summary : ईरान ने अमेरिका के दबाव के आगे न झुकने का दावा किया है। राष्ट्रपति रईसी ने ट्रम्प की सैन्य कार्रवाई की धमकी के बाद बातचीत या युद्ध के लिए तत्परता घोषित की। ईरान अंतर्राष्ट्रीय वार्ता के बीच अपने परमाणु कार्यक्रम पर कायम है।

Web Title : Iran Defiant: Won't Bow to Pressure, Responds to Trump's Threat

Web Summary : Iran asserts it won't yield to US pressure amid rising tensions. President Raisi declared readiness for negotiations or war following Trump's threat of military action. Iran remains firm on its nuclear program amidst ongoing international talks.