इस्रायलच्या हल्ल्यात इराणची मोठी हानी, कमांडर इन चीफ अमीर हतामींचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2026 17:23 IST2026-02-28T17:22:36+5:302026-02-28T17:23:36+5:30
US-Israel Iran War: अमेरिका आणि इस्रायलने आज सकाळपासून इराणवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली असून, या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये मोठ्या संघर्षाला तोंड फुटले आहे. या संघर्षात दरम्यान सुरुवातीलाच इराणची मोठी हानी झाली असून, इस्राईलने केलेल्या हल्ल्यात इराणचे कमांडर इन चीफ अमीर हतामींचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या हल्ल्यात इराणची मोठी हानी, कमांडर इन चीफ अमीर हतामींचा मृत्यू
अमेरिका आणि इस्रायलने आज सकाळपासून इराणवर जोरदार हल्ले करण्यास सुरुवात केली असून, या हल्ल्यांमुळे आखाती देशांमध्ये मोठ्या संघर्षाला तोंड फुटले आहे. इराणनेही इस्राइलसह आखाती देशातील अमेरिकेच्या सैनिकी तळांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. या संघर्षात दरम्यान सुरुवातीलाच इराणची मोठी हानी झाली असून, इस्राईलने केलेल्या हल्ल्यात इराणचे कमांडर इन चीफ अमीर हतामींचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, आज सकाळपासूनच इस्राइलने इराणची राजधानी असलेल्या तेहरामध्ये मोठ्या प्रमाणावर क्षेपणास्त्रांद्वारे हल्ले करण्यास सुरुवात केली होती. या हल्ल्यांमुळे तेहरानमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटांचे आवाज येत होते. या हल्ल्यांदरम्यान, इस्राइलकडून इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह खामेनेई यांची कार्यालये आणि इराणच्या राष्ट्रपतींनाही लक्ष्य करण्यात आल्याचे इस्राईलने सांगितले आहे.
तर अमेरिका आणि इस्रायलच्या या हल्ल्याला इराणनेही जोरदार प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलवर मोठ्या प्रमाणात क्षेपणास्त्र हल्ले केले. तसेच इराणने संयुक्त अरब अमिरातीसह इतर आखाती देशांमध्ये असलेल्या अमेरिकेच्या सैनिकी तळांनाही लक्ष्य केले.