शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:57 IST

Iran-Isreal Conflict: इस्त्रायलने इराणमधील अण्वस्त्र आणि मिसाईल प्रोग्रामला टार्गेट केले आहे. हे ना केवळ आमच्यासाठी तर जगासाठीही धोकादायक होते असं पंतप्रधान नेतन्याहू म्हणाले.

तेल अवीव - इराणने इस्त्रायलच्या हॉस्पिटलवर मिसाईल हल्ला केल्यानंतर इस्त्रायली संरक्षण मंत्री यांनी तेहरानवर नव्या पद्धतीने हल्ला करण्याची घोषणा केली आहे. त्याशिवाय इराणचे सुप्रीम लीडर अयातुल्ला अली खामेनेई यांनाही संपवण्याचा उघड इशारा त्यांनी दिला आहे. याआधीही इस्त्रायली पंतप्रधान नेतन्याहू यांनी इराणला हल्ल्याची किंमत चुकवावी लागेल असा कठोर इशारा दिला होता. 

इस्त्रायलचे संरक्षण मंत्री कॅट्ज म्हणाले की, दक्षिणी इस्त्रायलच्या सोरोका हॉस्पिटलवर बॅलेस्टिक मिसाईलने हल्ला झाला आहे. या हल्ल्यासाठी इराणचे नेते अली खामेनेई यांना वॉर क्राईमसाठी जबाबदार ठरवले आहे. हा हुकुमशाह एका बंकरखाली बसला आहे. जाणुनबुजून इराण इस्त्रायलमधील हॉस्पिटल आणि नागरी वस्त्यांना टार्गेट करत आहे. हे खूप वाईट वॉर क्राइम आहे. याची शिक्षा खामेनेई यांना मिळायला हवी असं त्यांनी म्हटलं. 

त्याशिवाय पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही आयडीएफला इराणमधील महत्त्वाची ठिकाणे, तेहरानमधील सरकार संबंधित वास्तूंवर आणखी जास्त हल्ले करण्याचे निर्देश दिले आहेत. इस्त्रायलला वाढणारा धोका तात्काळ संपवावा आणि खामेनेई सरकार अस्थिर करावे अशा सूचना इस्त्रायली पंतप्रधानांनी दिल्याचे संरक्षण मंत्र्‍यांनी म्हटलं आहे. संरक्षण मंत्र्‍यांच्या आधी इस्त्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनीही खामेनेई सरकारला इशारा दिला आहे. इस्त्रायलमध्ये नागरी वस्त्यांवर आणि हॉस्पिटल हल्ल्याला चोख प्रत्युत्तर देण्याची शपथ त्यांनी घेतली आहे. 

दरम्यान, इस्त्रायलने इराणमधील अण्वस्त्र आणि मिसाईल प्रोग्रामला टार्गेट केले आहे. हे ना केवळ आमच्यासाठी तर जगासाठीही धोकादायक होते. मात्र इराण इस्त्रायली हॉस्पिटल, नागरी वस्त्यांमध्ये लहान मुले यांच्यावर हल्ले करत आहे. इराण आणि इस्त्रायल यांच्यात नैतिकता समानता नाही. इस्त्रायल त्या लोकांचा खात्मा करण्यासाठी मागे हटणार नाही जे इस्त्रायल आणि अमेरिकेला मारण्याची घोषणा करतात असंही नेतन्याहू यांनी म्हटलं आहे. 

इराणचा हल्ला

इराणने इस्त्रायलवर पलटवार करत इस्त्रायलच्या तेल अवीव, बीर्शेबा, रमतगन आणि होलोन या शहरांवर बॅलेस्टिक मिसाईल डागल्या आहेत. त्यात एक मिसाईल तेल अवीवच्या सोरोका हॉस्पिटलवर पडली. या हल्ल्याने हॉस्पिटलचे मोठे नुकसान झाले. लोकांमध्ये गोंधळ उडाला. या हल्ल्यात अनेकजण जखमी झाल्याचेही पुढे आले आहे. 

टॅग्स :IranइराणIsraelइस्रायल