शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
4
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
5
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
6
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
7
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
8
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
9
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
10
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
11
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
12
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
13
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
14
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
15
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
16
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
17
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
18
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
19
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
20
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
Daily Top 2Weekly Top 5

कुलभूषण जाधव प्रकरण: पाककडून व्हिएन्ना कराराचं उल्लंघन; आंतरराष्ट्रीय न्यायालयानं फटकारलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2019 13:22 IST

लभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला फटकारलं आहे.

संयुक्त राष्ट्रे: कुलभूषण जाधव प्रकरणावरून आंतरराष्ट्रीय न्यायालयानं पाकिस्तानला फटकारलं आहे. कुलभूषण जाधव यांना देण्यात आलेल्या वागणुकीवरून पाकिस्ताननं व्हिएन्ना कराराचं उल्लंघन केल्याचा ठपका आंतरराष्ट्रीय न्यायालयानं ठेवला आहे.  आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायमूर्ती अब्दुलकावी वुसुफ यांनी संयुक्त राष्ट्राच्या महासभेत हे सांगितलं आहे. कुलभूषण प्रकरणात 17 जुलैला जारी करण्यात आलेल्या आदेशाचा हवाला देत ते म्हणाले,   पाकिस्तान कुलभूषण प्रकरणात व्हिएन्ना करारांतर्गत येणाऱ्या कलम 36चं उल्लंघन केलं आहे. या प्रकरणात त्यांनी योग्य पावलं उचलली नसल्याचंही न्यायालयानं म्हटलं आहे.193 देशांची सदस्यसंख्या असलेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत युसूफ म्हणाले, व्हिएन्ना करारानुसार कायदेशीर मदत देणं बंधनकारक आहे, पण पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना तशी मदत दिलेली नाही. पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना हेरगिरी करत असल्याच्या संशयावरून अटक केली होती. परंतु व्हिएन्ना करारात हेरगिरीसाठी वेगळ्या अशा कोणत्याही तरतुदीचा उल्लेख नाही. त्यामुळे पाकिस्ताननं मदत देणं आवश्यक होतं. भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस देण्यास पाकिस्ताननं नकार दिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालयानं झटका दिल्यानंतर पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना पहिल्यांदा काऊन्सिलर अ‍ॅक्सेस दिला होता. गेल्या काही महिन्यांपूर्वी भारताच्या उप उच्चायुक्त गौरव अहलुवालिया यांनी कुलभूषण जाधव यांची भेट घेतली होती. दोघांत जवळपास दोन तास चर्चा झाली होती. सुरक्षेच्या कारणास्तव चर्चेचे ठिकाण जाहीर केलेले नाही. ही भेट इस्लामाबादमधील एका अज्ञात ठिकाणी झाल्याचे पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले होते.कुलभूषण यांना 2016 साली अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच सुमारे तीन वर्षांनंतर कुलभूषण यांनी  कॉउन्सिलर अ‍ॅक्सेस मिळाला होता. भारतानं आंतरराष्ट्रीय स्तरावरून दबाव आणल्यामुळे पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांना त्यांच्या आई आणि पत्नीला भेटण्याची परवानगी दिली होती. मात्र यावेळी पाकिस्ताननं जाधव यांच्या आई आणि पत्नीला अतिशय वाईट वागणूक दिली होती. कुलभूषण जाधव यांना भेटण्याआधी पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी त्यांच्या आई आणि पत्नीला मंगळसूत्र काढायला सांगितलं होतं. यानंतर काही दिवसांनी पाकिस्ताननं कुलभूषण जाधव यांचा एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. यामध्ये कुलभूषण स्वत:ला हेर म्हणत होते. मात्र, हा व्हिडीओ पाकिस्ताननं दबावाखाली तयार केल्याचा आरोप झाला होता.  

टॅग्स :Kulbhushan Jadhavकुलभूषण जाधव