शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
4
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
5
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
6
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
7
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
8
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
9
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
10
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
11
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
12
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
13
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
14
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
15
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
16
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
17
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
18
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
19
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
20
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
Daily Top 2Weekly Top 5

'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2025 18:42 IST

Indus Waters Treaty: भारताने सिंधू पाणी अनिश्चित काळासाठी स्थगित केल्यामुळे पाकिस्तान प्रचंड अस्वस्थ झाला आहे.

Indus Waters Treaty: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेपाकिस्तानसोबत गेल्या साठ वर्षांपासून असलेला सिंधू पाणी करार अनिश्चित काळासाठी स्थगित केला आहे.  पाकिस्तानमधील सुमारे 80 टक्के शेती सिंधूच्या पाण्यावर अवलंबून आहे. भारताच्या या निर्णयामुळे पाकिस्तानची दुखती नस दाबली गेली आहे. यामुळे पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारी याने भारताला थेट रक्तपाताची धमकी दिली होती. पण, आता पाण्यासाठी व्याकुळ झालेल्या पाकिस्तानने माघार घ्यायला सुरुवात केली आहे. 

पाण्यावरुन युद्ध लढली जातील...शुक्रवारी (23 मे 2025) पाकिस्तानी संसदेत सिंधू पाणी कराराबाबत चर्चा झाली. यावेळी खासदार सय्यद अली जफर याने आपल्या भाषणात म्हटले की, पाण्याचा प्रश्न पाकिस्तानसाठी दहशतवादाच्या मुद्द्याइतकाच महत्त्वाचा आहे. सिंधू पाणी करार स्थागित करणे आपल्यावर लादलेले एकप्रकारे युद्धच आहे. 21व्या शतकातील युद्धे पाण्यावरून लढली जातील, हे आज सिद्ध होत आहे.

...तर आपण मरू शकतोतो खासदार पुढे म्हणतो, पाकिस्तान हा पाण्याची सर्वाधिक कमतरता असलेला जगातील क्रमांक एकचा देश आहे. आज देश वेगाने पाणीटंचाईकडे वाटचाल करत आहे. याची दोन कारणे आहेत, पहिले हवामान बदल आणि दुसरे लोकसंख्या. म्हणून, हे दहशतवादाइतकेच महत्त्वाचे आहे. सिंधू खोरे ही आपली जीवनरेखा आहे. देशातील तीन चतुर्थांश पाणी बाहेरून येते. देशातील 10 पैकी 9 लोक सिंधू जल खोऱ्याच्या मदतीने आपले जीवन जगत आहेत. पाकिस्तानमधील सर्व वीज प्रकल्प आणि धरणे याच पाण्यावर बांधली आहेत. हा आपल्यावर पडलेला वॉर बॉम्ब आहे, जो आपल्याला निकामी करायचा आहे. आपण हा पाण्याचा प्रश्न सोडवला नाही, तर आपण उपासमारीने मरू शकतो, अशी भीती त्याने व्यक्त केली. 

 

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरIndiaभारतPakistanपाकिस्तान