भारताची बेलारूसला १०० दशलक्ष डॉलरची मदत

By Admin | Updated: June 4, 2015 00:36 IST2015-06-04T00:36:23+5:302015-06-04T00:36:23+5:30

भारताच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकारामध्ये रुची घेतलेल्या बेलारूसला संयुक्त उपक्रमांसाठी भारत १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा पतपुरवठा करणार आहे.

India's $ 100 million aid to Belarus | भारताची बेलारूसला १०० दशलक्ष डॉलरची मदत

भारताची बेलारूसला १०० दशलक्ष डॉलरची मदत

मिन्स्क : भारताच्या ‘मेक इन इंडिया’ पुढाकारामध्ये रुची घेतलेल्या बेलारूसला संयुक्त उपक्रमांसाठी भारत १०० दशलक्ष अमेरिकन डॉलरचा पतपुरवठा करणार आहे.
भारत सरकारचा हा निर्णय राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी बेलारूसचे राष्ट्रपती ए. जी. लुकाशेन्को यांना बुधवारी कळविला. पूर्व युरोपीय देश बेलारूस आणि भारताने संरक्षण आणि सुरक्षा क्षेत्रात संयुक्तपणे काम करण्याचा निर्णय घेतला आहे. भारत व बेलारूसमध्ये परस्परांमध्ये विश्वास व आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने १७ कलमी करार करण्यात आला. भारताने बेलारूसला बाजारपेठीय अर्थव्यवस्थेचा दर्जा बहाल करण्याच्या घेतलेल्या निर्णयाची माहिती मुखर्जी यांनी लुकाशेन्को यांना दिली, असे परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव (पश्चिम) नवतेज सरना यांनी पत्रकारांना सांगितले.

Web Title: India's $ 100 million aid to Belarus