ट्रेड डीलनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी करणार? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं सूचक विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2026 09:26 IST2026-02-15T09:26:02+5:302026-02-15T09:26:38+5:30
India-US Trade Deal Marco Rubio Statement: भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करारामध्ये रशियाकडून होणारी तेल खरेदी हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यात भारत आता रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करून व्हेनेझुएलाकडील तेल खरेदी करणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता.

ट्रेड डीलनंतरही भारत रशियाकडून तेल खरेदी करणार? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांचं सूचक विधान
भारत आणि अमेरिकेमधील व्यापार करारामध्ये रशियाकडून होणारी तेल खरेदी हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे. त्यात भारत आता रशियाकडून होणारी तेल खरेदी बंद करून व्हेनेझुएलाकडील तेल खरेदी करणार असल्याचा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. याबाबत अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत. मात्र आता भारताला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून कुणीही अडवू शकत नाही, हे स्पष्ट झाले आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी याबाबत भारताची बाजू मांडली होती. त्यानंतर याबाबत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांचं वक्तव्य समोर आलं आहे.
म्युनिच सिक्युरिटी कॉन्फ्रेन्समध्ये अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो म्हणाले की, ‘भारताने अमेरिकेकडून अतिरिक्त रशियन तेल खरेदी करण्याबाबत कटिबद्धता मिळवली आहे. म्हणजेच सद्यस्थितीत भारत रशियाकडून जेवढं तेल खरेदी करत आहे, तेवढं खरेदी करत राहील’. रुबियो यांच्या या विधानामुळे भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार कराराबाबत अनेक गोष्टी स्पष्ट होत आहेत. भारत आपल्या धोरणात्मक स्वायत्ततेला आणि उर्जेच्या सुरक्षेला सर्वोच्च स्थान देतो त्यामुळे रशियाकडून तेल खरेदी करण्यावर कुणीही बाहेरील शक्ती अडवू शकत नाही, असे भारताने स्पष्ट केले होतो.
मार्को रुबियो यांचं हे विधान भारत आणि अमेरिका व्यापार करारानंतर समोर आलं आहे. त्यामाध्यमातून अमेरिकन प्रशासनाने भारताच्या स्वतंत्र धोरणाला मान्यता दिली आहे. रुबियो पुढे म्हणाले की, रशिया युक्रेनसोबतचं युद्ध संपुष्टात आणण्यासाठी इच्छूक आहे की नाही याबाबत आम्हाला कल्पना नाही. रशियाने युद्ध संपुष्टात आणण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मात्र त्यांच्या अटीशर्ती युक्रेनला मान्य होतील का हा एक प्रश्नच आहे. या पार्श्वभूमीवर अमेरिका दोन्ही देशांमध्ये स्वीकारार्ह तडजोडीच्या शक्यतेची चाचपणी करत आहे. दरम्यान, अमेरिकेकडून युक्रेनला लष्करी मदत दिली जात आहे. तसेच रशियावर दबाव आणणं थांबवण्यात आलेलं नाही. तसेच रशियाकडून तेल खरेदी करण्यावर अतिरिक्त निर्बंध लादण्यात आले आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली आहे.
मात्र मार्को रुबियो यांच्या या वक्तव्यामधील सर्वात चर्चित भाग हा भारतासंदर्भात केलेलं विधान हाच राहिला आहे. ते म्हणाले की, भारतासोबत आमची चर्चा सुरू आहे. भारताने रशियाकडून अतिरिक्त तेल खऱेदी न खरेदी करण्याबाबत सांगितले आहे. युरोपनेही या दिशेने पावलं टाकली आहेत, रुबियो यांच्या या विधानामुळे रशियन तेल खरेदी करण्याबाबत चित्र स्पष्ट झाले आहे. तसेच भारताने रशियाकडून तेल खरेदी करणे थांबवण्याबाबत काहीही सांगितलेले नाही, याबाबतही स्पष्ट झाले आहे.