शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘भारत-अमेरिका संबंध नव्याने आखले जावे’

By admin | Updated: May 24, 2014 04:22 IST

नव्या भाजपा सरकारकडून भारत-अमेरिका संबंध व्यवस्थित केले जावे, असे मत अमेरिकन भारतीयांनी व्यक्त केले

वॉशिंग्टन : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार्‍या नव्या भाजपा सरकारकडून भारत-अमेरिका संबंध व्यवस्थित केले जावे, असे मत अमेरिकन भारतीयांनी व्यक्त केले. भारतीय-अमेरिकी उद्योजक एम.आर. रंगास्वामी म्हणाले की, आता प्रत्यक्ष कार्य करण्याची वेळ आहे. दोन्ही देशांचे संबंध मजबूत करण्यासाठी १०० दिवसांच्या सक्रिय प्रयत्नांची आवश्यकता आहे. सिलिकन व्हॅलीचे उद्योजग रंगास्वामी इंडियास्पोराचे संस्थापक आहेत. ते म्हणाले की, नवीन पंतप्रधान आल्यामुळे मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे एकत्रित येऊन काम करायला पाहिजे. विश्वास दृढ करून संबंध पुढे न्यायला हवे. रंगास्वामी उदाहरणादाखल म्हणाले की, राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा भारतासमवेत संयुक्त राष्ट्र परिषदेच्या सुधारणेला पुढे नेऊ शकतात. भारतालासुद्धा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळू शकते. मोदी सरकार अमेरिकन नागरिकांना व्हिसा आॅन अरायव्हल सुविधा उपलब्ध करून देऊ शकतात. (वृत्तसंस्था) उद्योजक गुरराज देशपांडे म्हणाले की, लोकशाही पुढे नेण्यासाठी भारत-अमेरिका संबंध अत्यंत दृढ होणे गरजेचे आहे. दोन्ही देशांतील आर्थिक वृद्धीकरिताही मजबूत संबंधाची आवश्यकता आहे. आतापर्यंत अमेरिका आणि मोदींचे संबंध वादग्रस्त राहिले आहेत. अमेरिकेकडून व्हिसासाठी अडचणी येत होत्या. ते म्हणाले की, आता नरेंद्र मोदींकडे स्पष्ट बहुमत आहे. भारत आता विकसनशील धोरणासह प्रगती करेल. मोदी एक मजबूत नेते म्हणून उदयास आले आहेत. देशाचा विकास करण्यास ते सक्षम आहेत. देशपांडे म्हणाले की, भारताला आर्थिक वृद्धीदर पुन्हा एकदा ७ ते १० टक्क्यांवर पोहोचवावा लागेल. (वृत्तसंस्था)