भारत-पाक यांनी शेजारी म्हणून नांदले पाहिजे- शरीफ

By Admin | Updated: October 11, 2015 02:57 IST2015-10-11T02:57:59+5:302015-10-11T02:57:59+5:30

भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न चर्चेच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत आणि चांगले शेजारी म्हणून नांदले पाहिजे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केले.

India-Pak should be nurtured as neighbors - Sharif | भारत-पाक यांनी शेजारी म्हणून नांदले पाहिजे- शरीफ

भारत-पाक यांनी शेजारी म्हणून नांदले पाहिजे- शरीफ

लाहोर : भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरसह सर्व प्रश्न चर्चेच्या मार्गानेच सोडविले पाहिजेत आणि चांगले शेजारी म्हणून नांदले पाहिजे, असे मत पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी व्यक्त केले.
येथे गव्हर्नर हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले की, संयुक्त राष्ट्रात मी मोठ्या धाडसाने काश्मीर प्रश्न उपस्थित केला आणि माझ्या मनातून मी बोललो. आम्ही दोघेही चांगले शेजारी म्हणून राहून काश्मीरवर तोडगा काढला पाहिजे. मी भारतीय नेत्यांच्या नजरेत नजर घालूनच सत्य काय ते बोललो. संयुक्त राष्ट्रांनी केलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे चांगले राहील. (वृत्तसंस्था)

 

Web Title: India-Pak should be nurtured as neighbors - Sharif