शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

मी गरीब देशांतील लोकांना अमेरिकेत घुसू देणार नाही; आशिया, आफ्रिकेतील देशांना ट्रम्प यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:06 IST

जे अमेरिकेसाठी धोकादायक वाटताहेत त्यांना हाकलून देणार, सवलती बंद करण्याची धमकी

वॉशिंग्टन - व्हाइट हाउसनजीक दोन नॅशनल गार्डवरच्या गोळीबारप्रकरणावरून संतप्त झालेल्या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी तिसऱ्या जगातून अमेरिकेत येणाऱ्या नागरिकांचे सर्व स्थलांतर थांबवू अशी धमकी दिली आहे. आणि जे परदेशी नागरिक अमेरिकेच्या सुरक्षिततेला धोकादायक वाटत आहेत, त्यांची अमेरिकेतून हकालपट्टी करण्यात येईल अशीही त्यांनी धमकी दिली आहे.

एक्स या सोशल मीडियावरील टूथ सोशल अकाउंटवरून ट्रम्प यांनी बायडन प्रशासनाच्या काळात झालेल्या अफगाणिस्तानातून व अन्य देशातून झालेल्या मोठ्या प्रमाणावरील स्थलांतरावरून माजी अध्यक्ष बायडन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. या स्थलांतरावर आपण बंदी घालूच पण बायडन व त्यांचे ठग साथीदार यांचे कारनामे विसरणार नाही, असे वक्तव्य ट्रम्प यांनी केले आहे. बुधवारी व्हाइट हाउसनजीक एका अफगाण निर्वासिताने नॅशनल गार्डच्या दोन जवानांवर गोळीबार केला होता.

ग्रीन कार्डची तपासणी

अमेरिकेतील ग्रीन कार्ड धारकांची सखोल पुनर्तपासणी केली जाणार असल्याचे ट्रम्प प्रशासनाने गुरुवारी स्पष्ट केले. तर ट्रम्प यांनी स्थलांतरितांना दिल्या जाणाऱ्या सरकारी सवलती, फायदे कायमस्वरूपी बंद करणार असल्याचीही धमकी दिली आहे. जे स्थलांतरित, निर्वासित देशातील शांतता, स्थैर्य बिघडवण्याचा प्रयत्न करतात, सुरक्षिततेला धोकादायक ठरतात आणि जे पाश्चात्त्य संस्कृतीशी जुळवून घेऊ शकत नाहीत, त्यांनाही हाकलण्यात येईल असे ट्रम्प म्हणाले.

आयकर मुक्त अमेरिका ?

टॅरिफच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल मिळत असल्याने अमेरिकी नागरिकांवरील आयकर रद्द करण्याचा निर्णय प्रशासन घेऊ शकते, असे विधान ट्रम्प यांनी गुरुवारी केले. आमचे प्रशासन देशातील करधोरणात मोठ्या प्रमाणात बदल आणत असून टैरिफ आणल्याने मिळणारा महसूल प्रचंड असेल.त्यामुळे देशातील आयकर रद्द करण्याचा निर्णय सरकार घेऊ शकते. हा आयकर काही प्रमाणात किंवा तो संपूर्णही रद्द केला जाऊ शकतो, असे ट्रम्प म्हणाले.एका नॅशनल गार्डचा मृत्यू

अफगाण निर्वासिताच्या गोळीबारात साराह बेकस्ट्रॉर्म (२०) या नॅशनल गार्डमधील कार्यरत महिलेचा मृत्यू झाला असून अँड्रयू वोल्फ (२४) यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे ट्रम्प यांनी सांगितले. या हल्लेखोराचे नाव रेहमानुल्ला लकनवाल (२९) असून तो अफगाणिस्तानात अमेरिकी गुप्तचर संघटना सीआयएचा हस्तक म्हणून काम करत होता, असेही ट्रम्प यांनी सांगितले.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Trump vows to block entry from poor nations, slams Biden.

Web Summary : Furious over a shooting near the White House, Trump threatens to halt immigration from third-world countries and deport those deemed dangerous. He criticizes Biden's handling of Afghan refugee resettlement and promises stricter green card checks and revoked benefits. Trump also suggests income tax cuts due to tariff revenue.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिका