शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

हिलरी-जिंदाल यांच्यात निवडणूक रंगणार?

By admin | Updated: June 25, 2015 23:46 IST

अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात भारतीय अमेरिकन उमेदवार बॉबी जिंदाल यांनीही उडी घेतली असून, स्वत: काम करणारा नेता

वॉशिंग्टन : अमेरिकेतील २०१६ च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या रिंगणात भारतीय अमेरिकन उमेदवार बॉबी जिंदाल यांनीही उडी घेतली असून, स्वत: काम करणारा नेता असल्याचे जाहीर केले आहे. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन व रिपब्लिकन पक्षातर्फे बॉबी जिंदल यांच्यातच अटीतटीची स्पर्धा रंगणार, असे दिसत आहे. ४४ वर्षांचे जिंदाल हे अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढविणारे पहिले अमेरिकन भारतीय आहेत. रिपब्लिकन पक्षातर्फे निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ते १३ वे उमेदवार आहेत. न्यू आॅरलिन्स येथे त्यांनी आपल्या उमेदवारीची घोषणा केली आहे. विद्यमान अध्यक्ष बराक ओबामा यांच्या हेल्थकेअर योजनेत बदल घडवून आणू आणि कट्टरवादी इस्लामवादाचा बीमोड करू, अशीही घोषणा जिंदाल यांनी केली आहे. माझे नाव बॉबी जिंदाल आहे. मी लुईसिना या राज्याचा गव्हर्नर आहे आणि आता अमेरिका या महान देशाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरत आहे, असे त्यांनी न्यू आॅरलिन्स येथील सभेत बोलताना जाहीर केले. जिंदाल यांची गव्हर्नरपदाचा कालावधी जानेवारी २०१६ मध्ये संपत आहे. ही निवडणूक लढवण्यासाठी आपण हेडक्वॉर्टरची परवानगी घेतलेली नाही, मी वेगळा उमेदवार आहे असे सांगत त्यांनी आपल्या विरोधकांना गप्प करण्याचा प्रयत्न केला आहे. पीयूष ते बॉबीपर्यंतचा प्रवासबॉबी जिंदाल यांचे मूळ नाव पीयूष आहे. त्यांचे माता-पिता हिंदू आहेत; पण त्यांनी युवावस्थेत आपला धर्म बदलला असून ते रोमन कॅथॉलिक आहेत. बॉबी हे नाव त्यांनी स्वत:च स्वत:साठी निवडले आहे. द ब्रेडी ब्रंच या टीव्ही मालिकेत एका पात्राचे नाव बॉबी होते. शाळेतून आल्यानंतर जिंदाल रोज ही मालिका पाहत असत. त्यातील बॉबी हे पात्र आवडत असल्याने त्यांनी स्वत:साठी हेच नाव निवडले. कागदोपत्री बॉबी यांचे नाव पीयूष असेच आहे; पण बाकी व्यवहारात ते बॉबी म्हणून ओळखले जातात. बॉबी जिंदाल यांच्या पत्नीचे नाव सुप्रिया असून या दाम्पत्याला तीन मुले आहेत. (वृत्तसंस्था)