शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित

By admin | Updated: March 5, 2016 02:50 IST

कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात

लंडन : कर्करोग प्रतिबंधक पहिली लस विकसित केल्याचा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. ही लस शरीरातील इम्यून सिस्टिम सक्रिय करेल व त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढून कर्करोगाच्या गाठी नष्ट होतात, असे त्यांचे म्हणणे आहे. ही लस यशस्वी ठरल्यास कर्करोगांसाठी ही एक महान देणगी ठरणार आहे.या लसीचा प्रयोग कर्करोग झालेल्या एका महिलेवर करण्यात आला आहे. एखाद्या रुग्णाला लस दिली जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. रुग्णाच्या शरीरात रोगप्रतिकारक क्षमता वाढवून कर्करोगाचा नायनाट करण्याचे या संशोधनामागे सूत्र आहे.या लसीत एक खास प्रकारचे प्रोटीन एन्झाईम असून तो कर्करोगाच्या पेशी नष्ट करतो. या इंजेक्शनमुळे शरीरात अशा अ‍ॅन्टीबॉडिज बनतील की त्या शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतील. या अ‍ॅन्टीबॉडिज कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करतील, पण शरीरासाठी आवश्यक असणाऱ्या पेशी नष्ट करणार नाहीत. ही चाचणी यशस्वी होवो की न होवो, पण ती नक्कीच सुरक्षित असल्याचा आमचा विश्वास असून आम्हाला या चाचणीच्या निष्कर्षाची प्रतीक्षा आहे, असे एका शास्त्रज्ञाने सांगितले.या भयावह रोगावर अद्याप खात्रीशीर उपचार सापडलेले नाहीत, त्यामुळेच या लसीच्या निष्कर्षाकडे लक्ष लागले आहे, असे युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनमधील संशोधकांनी सांगितले, हा सारा वृत्तांत ‘सायन्स’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे. या संशोधकांच्या पथकातील एक आघाडीचे संशोधन सर्गियो क्यू जादा म्हणाले की, आतापर्यंत करण्यात आलेल्या उपचारांमध्ये ही उपचार पद्धती विशिष्ट पद्धतीची असून पहिल्यांदाच ती अवलंबिण्यात आली आहे. आमच्यासाठी हा एक अभूतपूर्व अनुभव असून तो यशस्वी ठरण्यास केवळ ट्यूमर नष्ट करणाऱ्या अ‍ॅन्टीबॉडीज तयार करण्यावर भर देऊ.हे संशोधन अजून प्राथमिक स्थितीत असून ते यशस्वी झाल्यास रुग्णांना कर्करोगापासून मुक्ती मिळणार आहे. केली वॉटर (३५) या महिलेला गेल्या वर्षी जुलैमध्ये अ‍ॅडव्हान्स सर्व्हायकल कॅन्सर झाला होता. कर्करोगाची लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या तीस लोकांच्या यादीत तिचा समावेश होता. केली स्वत: खूपच आनंदी असून तिला याचा खूपच अभिमान वाटत आहे. ती म्हणाली की, ही लढाई कर्करोग निश्चित हारेल, असा मला विश्वास वाटतो. समजा असे न झाल्यास मी अन्य रुग्णांसाठी प्रेरणा ठरेन.