शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
2
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
5
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
6
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
8
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
9
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
10
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
11
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
12
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
13
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
14
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी
15
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
16
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
17
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
18
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
19
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
20
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका

‘थँक्सगिव्हिंग’पर्यंत हवाई वाहतूक ठप्प होण्याची भीती, अमेरिकेत २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द, प्रवासी झाले त्रस्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 06:59 IST

United State News: शनिवार हजारभर उड्डाणे रद्द झाल्यानंतर रविवारीही अमेरिकेतील विमान कंपन्यांनी २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. याचा मोठा फटका आंतरदेशीय विमान वाहतुकीला आणि हजारो प्रवाशांना बसला.

वॉशिंग्टन -  शनिवार हजारभर उड्डाणे रद्द झाल्यानंतर रविवारीही अमेरिकेतील विमान कंपन्यांनी २,१०० हून अधिक उड्डाणे रद्द केली. याचा मोठा फटका आंतरदेशीय विमान वाहतुकीला आणि हजारो प्रवाशांना बसला. जर शटडाऊनचा कालावधी थँक्सगिव्हिंग सुट्टीपर्यंत कायम राहिला, तर देशभरातील हवाई वाहतूक विस्कळीत होऊन ती ठप्प होईल, असा इशारा अमेरिकेच्या वाहतूकमंत्र्यांनी दिला आहे. 

अमेरिकेतील ४० प्रमुख  विमानतळांवरून हवाई सेवा देशभरात सुरू असते. या विमानतळांवर शुक्रवारी, शनिवार व रविवारीही हवाई सेवा  संपूर्णपणे कोलमडली दिसून आली. अमेरिकेच्या फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने शटडाऊनमुळे विमान उड्डाणांमध्ये कपात करण्याचे आदेश दिले आहेत. ही कपात शुक्रवारी चार टक्के होती, ती १४ नोव्हेंबरपर्यंत १० टक्क्यांपर्यंत वाढेल. ही कपात सध्या सकाळी ६ ते रात्री १० पर्यंत आहे. त्यात  वाहतूक नियंत्रकांना पगार मिळाल्याने त्यांनी कामावर येणे बंद केले आहे. 

हजारो उड्डाणे विलंबानेअमेरिकेतील हवाई सेवेवर देखरेख ठेवणाऱ्या फ्लाइटअवेअर या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, केवळ रविवारी ७ हजार विमान उड्डाणांना विलंब झाला, तर २,१०० हून अधिक विमान उड्डाणे रद्द करण्यात आली. शुक्रवारी १,००० हून अधिक आणि शनिवारी १,५०० हून अधिक उड्डाणे रद्द करण्यात आली होती. 

मवाळ डेमोक्रेट्समुळे शटडाऊन संपणार वॉशिंग्टन : रविवारी डेमोक्रॅटिक पक्षाच्या काही मवाळ सदस्यांनी आरोग्यसेवेच्या अनुदानांना मुदतवाढ देण्याचा मुद्दा वगळून रिपब्लिकन पक्षाशी चर्चा करण्यास तयारी दाखवली आहे. ही हातमिळवणी माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्या प्रयत्नातून झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : US Flight Chaos: Thanksgiving Travel Threatened, Thousands of Flights Canceled

Web Summary : Over 2,100 US flights canceled Sunday after thousands Saturday, impacting holiday travel. A potential shutdown could disrupt air travel nationwide. Staff shortages due to unpaid controllers worsened the crisis, with major airports heavily affected. Delays and cancellations continue, with efforts underway to resolve the political deadlock.
टॅग्स :United StatesअमेरिकाInternationalआंतरराष्ट्रीय