शहरं
Join us  
Trending Stories
1
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
2
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
3
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
4
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
5
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
6
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
7
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
8
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
9
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
10
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
11
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
12
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
13
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
14
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
15
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
16
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
17
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
18
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
19
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
20
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
Daily Top 2Weekly Top 5

नव्या घातक विषाणूने जगभरात घबराट; विदेशी प्रवाशांची कसून तपासणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2021 06:27 IST

१४ देशांत कोरोना साथ मोठ्या प्रमाणात आहे, तिथे मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाईल.

नवी दिल्ली : कोरोनाचा डेल्टापेक्षा भयंकर नवा विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळल्याने भारत सतर्क झाला आहे. दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हाँगकाँगमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांच्या तपासणीचे आदेश केंद्राने राज्यांना दिले आहेत. हा विषाणू इस्राएल व बेल्जियममध्येही आढळला आहे. ब्रिटनने आफ्रिकेच्या दक्षिणेकडील सहा देशांतील प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत. बी.१.१.५२९ हा नवा कोरोना विषाणू दक्षिण आफ्रिकेत आढळला असून, तो जगात डेल्टा विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे. दक्षिण आफ्रिकेत त्याची बाधा झालेले रुग्ण कमी आहेत. मात्र,  त्यामुळे जगभर चिंतेचे वातावरण आहे. उपचार न मिळालेल्या एड्सग्रस्त रुग्णाच्या शरीरातून हा जन्माला आला असावा, असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे.कोरोनामुळे स्थगित आंतरराष्ट्रीय विमानसेवा १५ डिसेंबरपासून पूर्ववत सुरू होणार आहे. ज्या १४ देशांत कोरोना साथ मोठ्या प्रमाणात आहे, तिथे मर्यादित आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू केली जाईल. प्रवाशांवर लक्ष ठेवा- केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी पत्रात नमूद केले आहे की, नव्या विषाणूमुळे सार्वजनिक आरोग्याला मोठा धोका निर्माण होऊ शकतो, कोरोना संसर्गाची तीव्रता कमी झाल्याने केंद्र सरकारने व्हिसाबाबतचे निर्बंध शिथिल केले असून, आंतरराष्ट्रीय प्रवाशांना भारतात येण्याची अनुमती दिली आहे. - मात्र या विषाणूमुळे विदेशातून भारतात येणाऱ्यांची राज्याच्या यंत्रणांद्वारे बारकाईने वैद्यकीय तपासणी अत्यावश्यक आहे. हे विदेशी प्रवासी भारतात भ्रमंती करताना कोणाच्या संपर्कात येतात, यावरही लक्ष ठेवणे आवश्यक आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस