इराण आता थेट अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत; आत्मघातकी ड्रोन समुद्रकिनाऱ्यांजवळ? FBI चा खळबळजनक अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2026 11:46 IST2026-03-12T11:44:04+5:302026-03-12T11:46:01+5:30

FBI Warns Iran Drone Attack California : FBI कडून अमेरिकेला रेड अलर्ट! कॅलिफोर्नियावर इराणच्या ड्रोन हल्ल्याची भीती

FBI Warning: Iran is now preparing to attack America directly; Suicide drones near beaches, FBI's sensational alert! | इराण आता थेट अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत; आत्मघातकी ड्रोन समुद्रकिनाऱ्यांजवळ? FBI चा खळबळजनक अलर्ट!

इराण आता थेट अमेरिकेवर हल्ल्याच्या तयारीत; आत्मघातकी ड्रोन समुद्रकिनाऱ्यांजवळ? FBI चा खळबळजनक अलर्ट!

अमेरिकन तपास संस्था FBI ने एक धक्कादायक इशारा दिला असून, इराणने अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यावर ड्रोनद्वारे मोठे हल्ले करण्याची योजना आखल्याचा खुलासा केला आहे. २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या लष्करी कारवाईचा सूड घेण्यासाठी इराण अशा प्रकारचे आत्मघाती पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे.

FBI च्या अहवालानुसार, इराणचे लष्करी गट कॅलिफोर्नियातील महत्त्वाच्या आस्थापनांना आणि गर्दीच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी प्रगत 'कामीकाझे' ड्रोनचा वापर करण्याची शक्यता आहे. अमेरिकेच्या भूमीवर अशा प्रकारे थेट हल्ला करण्याची इराणची ही पहिलीच मोठी आकांक्षा असल्याचे बोलले जात आहे.

इराण अमेरिकेच्या समुद्रकिनाऱ्यावर एका अज्ञात जहाजाद्वारे घातकी ड्रोन पोहोचविण्याच्या प्रयत्नात आहे. या ड्रोनद्वारे इराण अमेरिकेवर हल्ले चढविणार आहे. याच ड्रोनना थोपविण्यात अमेरिका अपयशी ठरली आहे. आखाती देशांतील अमेरिकेच्या तळांवर तसेच दुतावासांवर या आत्मघातकी ड्रोनद्वारेच हल्ले करण्यात आले आहेत. यामुळे अमेरिकेच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

गेल्या काही दिवसांत अमेरिका आणि इराणमधील संबंध युद्धजन्य परिस्थितीत पोहोचले आहेत. इराणने याआधीच इस्रायलवर क्षेपणास्त्र हल्ले केले आहेत, मात्र आता त्यांची नजर अमेरिकेच्या अंतर्गत सुरक्षा व्यवस्थेवर आहे. कॅलिफोर्नियात मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आणि संरक्षण संस्था असल्याने हे राज्य इराणच्या निशाण्यावर असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर
या इशाऱ्यानंतर कॅलिफोर्नियासह संपूर्ण अमेरिकेत हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. विमानतळ, बंदरे आणि सरकारी इमारतींची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. तसेच संशयास्पद हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी अमेरिकन हवाई दलालाही सज्ज राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

Web Title : ईरान अमेरिका पर हमले की तैयारी में; FBI ने दी ड्रोन की चेतावनी।

Web Summary : FBI ने चेतावनी दी है कि ईरान सैन्य कार्रवाई का बदला लेने के लिए कैलिफ़ोर्निया पर ड्रोन से हमला करने की योजना बना रहा है। कामिकेज़ ड्रोन महत्वपूर्ण स्थानों को निशाना बना सकते हैं। ईरान जहाज से ड्रोन तैनात करना चाहता है, जिससे अमेरिका के लिए सुरक्षा चुनौती बढ़ गई है। पूरे अमेरिका में हाई अलर्ट जारी।

Web Title : Iran preparing to attack America; FBI warns of drone threat.

Web Summary : FBI warns Iran plans drone attacks on California to avenge military actions. Kamikaze drones may target key locations. Iran seeks to deploy drones via ship, posing a major security challenge to the US. High alert declared across America.