शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: सरकारी कर्मचारी, शिक्षक आजपासून बेमुदत संपावर, त्यांच्या मागण्या काय आहेत? 
2
Jammu Ramnagar Bus Accident: चालकाचे नियंत्रण सुटलं, बस डोंगरावरून १०० मीटर खोल दरीत कोसळली, २१ जण ठार
3
Donald Trump: शांतता करार आजच होणार; इराणचे शिष्टमंडळही पोहोचणार, डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले?
4
ट्रम्प यांचा इराणला थेट इशारा! 'युद्धविराम संपला तर एवढे बॉम्ब पडतील की...', इस्लामाबाद चर्चेआधी तणाव वाढला!
5
...तर इराणवर पुन्हा ड्रोन-क्षेपणास्त्रांचा वर्षाव? "मोहीम अद्याप संपलेली नाही"; व्हाइट हाऊसनंतर आता नेतन्याहू यांचाही थेट इशारा
6
GT vs MI : हा माझा प्रॉब्लेम नाही! तिलक-बुमराहसंदर्भातील कळीच्या मुद्यावर पांड्या स्पष्टच बोलला
7
औराद शहाजानी परिसरात उष्माघाताने शेतकऱ्याचा मृत्यू; साेमवारी तापमान पाेहोचले ४२.८ अंशावर
8
IPL 2026 : "घासून नाही, ठासून हरवलं "! MI चं विक्रमी विजयासह दमदार कमबॅक; GT ला पहिल्यांदाच दिली मात
9
'लिव्ह इन पार्टनर'च्या छळाला कंटाळून ५१ वर्षीय महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न, मृत्यू झाल्यावर गुन्हा दाखल
10
रणजी क्रिकेटमध्ये संधी देण्याच्या नावाखाली दोन तरुणांना २० लाखांचा गंडा
11
कार्यकर्ता अपमानित होतो, तेव्हा माझ्यातील शिवसैनिक जागा : एकनाथ शिंदे
12
९३ दिवसांचा थरार अन् 'ऑपरेशन महादेव' फत्ते! पहलगामच्या मारेकऱ्यांचा असा घेतला भारतीय सैन्याने बदला!
13
मध्यपूर्वेतील राजकारणात मोठा भूकंप; "आता अमेरिकेची गरज नाही...!" UAE चा ट्रम्प यांना तगडा धक्का, नवा वाद पेटला
14
श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला ७ हजार आंब्यांचा महानैवेद्य; अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ट्रस्टकडून आंबा महोत्सव 
15
Tilak Varma Maiden IPL Hundred : तिलक वर्माची अविश्वसनीय सेंच्युरी; MI साठी ठरला खरा संकटमोचक!
16
Travel : भारतात आहे चक्क मंगळ ग्रहासारखी जागा! पर्यटकांची पहिली पसंती; 'हे' अजब ठिकाण पाहिलेत का?
17
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची बदली; एकूण ९ अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश निघाले... 
18
GT vs MI : स्टंप तोड गोलंदाजी! षटकारासह स्वागत झाल्यावर रबाडानं असा घेतला सूर्या दादाचा बदला (VIDEO)
19
पतीच्या मैत्रिणीस अडकवण्यासाठी चाकुरात पत्नीने केला पुतण्याचा खून; 'असा' झाला उलगडा
20
सराफवाडी येथे माय लेकाची गळफास घेवून आत्महत्या; कारण अस्पष्ट, वालचंदनगर पोलिसांकडून तपास सुरू 
Daily Top 2Weekly Top 5

‘स्पेसवॉक’साठी उद्योजक निघाले अंतराळात; पाच दिवस अंतराळात थांबणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2024 08:39 IST

इसाकमन यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत फ्लोरिडा येथून स्पेसएक्स ९ रॉकेटने अंतराळात उड्डाण केले

केप केनावेरल : अब्जाधीश उद्योजक जेयर्ड इसाकमन यांनी मंगळवारी पुन्हा एकदा अंतराळात झेप घेतली. अंतराळात प्रथमच खासगी पद्धतीने स्पेसवॉक करण्याच्या उद्देशाने जेयर्ड यांनी ही अंतराळ मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेसाठी त्यांनी स्पेसएक्ससोबत खर्च सामायिक केला आहे. स्पेससूट विकसित करणे व त्याची चाचणी घेणे हा मोहिमेचा उद्देश आहे.

सर्व काही नियोजनाप्रमाणे व ठरल्यानुसार झाले तर पहिल्यांदाच एखादा नागरिक अंतराळात स्पेसवॉक करण्याचा विक्रम नोंदवू शकणार आहे. मात्र, हा स्पेसवॉक करताना इसाकमन हे कॅप्सूलपासून दूर जाणार नाहीत. 

पाच दिवस अंतराळात थांबणार

स्पेसवॉक हा अंतराळ उड्डाणातील सर्वात धोकादायक भाग मानला जातो. यापूर्वी १९६५ सोवियत संघाच्या विघटनापूर्वी रशियाने अंतराळात यानाची हॅच अर्थात जाळी उघडली होती. रशियानंतर अमेरिकेने यानाचे हॅच उघडले होते. तेव्हापासून खासगी अंतराळवीर याकडे आवडीचे क्षेत्र म्हणून पाहतात.

इसाकमन यांनी मंगळवारी पहाटे दोन स्पेसएक्स अभियंत्यासोबत व एका माजी हवाई दल थंडरबर्ड वैमानिकासोबत फ्लोरिडा येथून स्पेसएक्स ९ रॉकेटने अंतराळात उड्डाण केले. या ५ दिवसांच्या अंतराळ दौऱ्यादरम्यान बुधवारी रात्री जेयर्ड इसाकमन स्पेसवॉक करू शकतात.आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापासून पुढे १ हजार ४०० किलोमीटर उंचीपर्यंत अंतराळवीर  जेयर्ड यात्रा करू शकतात. ही यात्रा यशस्वीरित्या पूर्ण झाली तर जेयर्ड हे १९६६ मध्ये नासाच्या जेमिनी प्रकल्पा दरम्यानच्या विक्रम मोडतील. चंद्रावर गेलेल्या २४ अपोलो मोहिमेतील अंतराळवीरांनीच यापुढे अंतर पार केले आहे.