शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2025 19:30 IST

Donald Trump: डोनाल्ड ट्रम्प एकापाठोपाठ एक मोठे निर्णय घेत आहेत.

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोमवारी (29 सप्टेंबर 2025) संपूर्ण जगाला आणखी एक मोठा धक्का दिला आहे. ट्रम्प यांनी अमेरिकेबाहेर निर्मित झालेल्या सर्व चित्रपटांवर 100 टक्के टॅरिफ (कर) लावण्याची घोषणा केली आहे. त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवरुन याची घोषणा केली. या निर्णयाचा फटका भारतात तयार होणाऱ्या चित्रपटांनाही बसणार आहे. 

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

आपल्या ट्रुथ सोशल अकाउंटवर केलेल्या पोस्टमध्ये ट्रम्प म्हणतात, "एखाद्या बाळाच्या हातून चॉकलेट चोरल्याप्रमाणे आपला चित्रपट निर्मिती व्यवसाय इतर देशांनी चोरुन नेला आहे. त्यामुळेच मी आता अमेरिकेबाहेर तयार होणाऱ्या सर्व चित्रपटांवर 100% टॅरिफ (कर) लावणार आहे. MAKE AMERICA GREAT AGAIN!", अशी घोषणा ट्रम्प यांनी केली.

भारतीय चित्रपटांच्या व्यवसायावर परिणाम

गेल्या काही वर्षांत अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा व्यवसाय जवळपास 20 मिलियन डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे. परंतु नव्या टॅरिफमुळे या उत्पन्नात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीपूर्वी अमेरिकेत भारतीय चित्रपटांचा बाजार सुमारे 8 मिलियन डॉलर्स एवढाच होता. त्यानंतर यात झपाट्याने वाढ झाली आणि तो 20 मिलियन डॉलर्सपर्यंत गेला.

भारतीय चित्रपटांची लोकप्रियता वाढली

गेल्या काही काळात अमेरिकेत भारतीय चित्रपटांची लोकप्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. हिंदी चित्रपट असो वा दक्षिण भारतीय चित्रपट असो, अनेक चित्रपटांनी अमेरिकेत चांगली कमाई केली आहे. परंतु ट्रम्प यांच्या नव्या घोषणेनंतर अमेरिकेत प्रदर्शित होणाऱ्या भारतीय चित्रपटांना मोठे नुकसान सहन करावे लागू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : Trump's tariff: 100% tax on foreign films, India hit hard.

Web Summary : Donald Trump imposed a 100% tariff on films made outside America. Indian films, grossing $20 million in the US, face potential losses due to this new tax. The tariff impacts Bollywood and South Indian cinema's earnings.
टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाIndiaभारतbollywoodबॉलिवूड